Apple चे सीईओ टीम कूकसह सोनम कपूरने पाहिली मॅच, अभिनेत्रीच्या लुकचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 13:01 IST2023-04-21T13:00:13+5:302023-04-21T13:01:54+5:30
लिनन साडीत सोनम कपूर दिसली ग्लॅमरस

Apple चे सीईओ टीम कूकसह सोनम कपूरने पाहिली मॅच, अभिनेत्रीच्या लुकचं होतंय कौतुक
अॅप्पलचे सीईओ टीम कूक (Tim Cook) काही दिवसांपासून भारतात आहेत. भारतातल्या विविध गोष्टींचा ते आनंद लुटत आहेत. टीम कूक यांच्या उपस्थितीत मुंबई आणि दिल्ली येथे अॅपलचे पहिले आऊटलेट उघडले गेले. आधी अभिनेत्री माधुरी दीक्षितने टीम कुकचे मुंबईचा फेमस वडापावने स्वागत केले. आता त्यांनी अभिनेत्री सोनम कपूरसोबत (Sonam Kapoor) आयपीएल मॅच एंजॉय केली. सोनमने इन्स्टाग्रावर फोटो पोस्ट केले आहेत. यातील सोनमच्या लुकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलंय.
टीम कुक यांनी दिल्लीत असताना सोनम कपूर, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि इतरांसह आयपीएल मॅच पाहण्याचा आनंद घेतला. कुक यांनी 2016 मध्ये देखील शुक्ला यांच्यासोबत मॅच पाहिली होती. टीम कूक यांनी सोनम कपूरचे ट्वीट रिट्वीट करत लिहिले, 'आठवणीत राहणाऱ्या संध्याकाळसाठी धन्यवाद!'
सोनम कपूर यावेळी साध्या लिननच्या पिवळ्या साडीत पोहोचली होती. यावर तिने साजेसे दागिने घातले होते. तर केसांची स्टाईलही सुंदर होती. हा पारंपारिक लुक केल्याने सोनमचं सोशल मीडियावर खूपच कौतुक होतंय. यावेळी सोनमचा नवरा उद्योगपती आनंद आहुजाही उपस्थित होता.