प्रसिद्ध अभिनेत्याने केलं श्रेयस अय्यरच्या खेळीचं कौतुक, पण तरीही 'या' गोष्टीबाबत व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:17 IST2025-06-02T11:17:03+5:302025-06-02T11:17:36+5:30

श्रेयसला आता तो धोनी असल्यासारखंच..., अभिनेत्याची सूचक पोस्ट

aparshakti khurana praises shreya iyer after ipl qualifier match also says he deserve to be in team india | प्रसिद्ध अभिनेत्याने केलं श्रेयस अय्यरच्या खेळीचं कौतुक, पण तरीही 'या' गोष्टीबाबत व्यक्त केली खंत

प्रसिद्ध अभिनेत्याने केलं श्रेयस अय्यरच्या खेळीचं कौतुक, पण तरीही 'या' गोष्टीबाबत व्यक्त केली खंत

आयपीएल २०२५ (IPL 25) च्या क्वॉलिफायर सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि थेट फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यानंतर श्रेयसवर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसंच श्रेयसला टीम इंडियाच्या पुढील कसोटी सामन्यात संधी मिळाली नसल्याने अनेकांनी त्यावरही बोट ठेवलं आहे. अभिनेता अपारशक्ती खुरानाने (Aparshakti Khurana) या मुद्द्यावर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. 

कालच्या आयपीएल सामन्यानंतर श्रेयस अय्यर हा हिरो बनून समोर आला आहे. त्याने अतिशय संयम दाखवत नाबाद ८७ धावा केल्या. अपारशक्ती खुरानाने श्रेयससाठी पोस्ट शेअर करत लिहिले, "यंदा आयपीएल फायनल पंजाब विरुद्ध बंगळुरु व्हावी अशी मनापासून इच्छा होतीच आणि तेच होणार याचा आनंदही आहे. पण आजपर्यंत मी बऱ्याच कारणांमुळे मुंबई इंडियन्सचा चाहता होतो. खरं तर मी चांगल्या क्रिकेटचा चाहता आहे. आजचा सामना खूपच खास होता. पंजाबने ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग केला ते लाजवाब होतं. तसंच कर्णधाराला पुढे राहून लढताना पाहणं आणखी खास होतं. उफ! तो धोनीसारखाच बनला आहे का की हे त्याच्या मनातलं दु:ख होतं ज्या संघाविरोधात तो जिंकला त्यातले खेळाडू पुढील महिन्यात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत ज्यात त्याला स्वत:लाच संधी मिळालेली नाही. मला माहितीये सिलेक्शन कमिटीची काही प्रक्रिया असते म्हणूनच ते त्या पदावर आहेत. पण मला जे काही थोडंफार क्रिकेटबद्दल माहीत आहे त्यावरुन मला हेच वाटतं की श्रेयस अय्यर भारतीय संघात असावा त्यासाठी तो पात्र आहे."


अपारशक्तीच्या या पोस्टवर अनेकजण सहमत होते. नेटकऱ्यांनीही श्रेयसच्या खेळीचं कौतुक केलं आणि त्याला संधी मिळायलाच हवी होती असं मत व्यक्त केलं. आता उद्या होणाऱ्या आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु विरोधात पंजाब असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांपैकी जो जिंकेल तो पहिल्यांदाच ट्रॉफी हातात घेणार आहे.

Web Title: aparshakti khurana praises shreya iyer after ipl qualifier match also says he deserve to be in team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.