अनुष्का शर्माच्या या गाऊनची किंमत वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 13:13 IST2018-12-21T13:08:04+5:302018-12-21T13:13:13+5:30
शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला झिरो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी हजेरी लावली होती. हे तिघेही या कार्यक्रमात डॅशिंग अंदाजात दिसले.

अनुष्का शर्माच्या या गाऊनची किंमत वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
इंडियन आयडॉलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. आता खूपच कमी स्पर्धक शिल्लक असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळयांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या फिनालेचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. आता तर कार्यक्रमाच्या फिनालेला बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी त्या तिघांनी नुकतेच चित्रीकरण केले.
शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला झिरो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी हजेरी लावली होती. हे तिघेही या कार्यक्रमात डॅशिंग अंदाजात दिसले. अनुष्काने तर घातलेल्या गाऊनची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. या गाऊनमध्ये ती खूपच छान दिसत असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. या गाऊनची किंमत काय आहे हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. या गाऊनची किंमत 1,69,999 रुपये आहे.
इंडियन आयडॉल फिनालेच्या चित्रीकरणाला शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांनी तिघांनीही खूपच धमाल मस्ती केली. स्पर्धक आणि या कार्यक्रमाचे परीक्षक सलीम-सुलेमान, नेहा कक्कर, विशाल दादलानी त्यांना भेटून खूपच खूश झाले होते.
इंडियन आयडॉलच्या आजवरच्या अनेक सिझनप्रमाणे हा सिझन देखील प्रेक्षकांना आवडला होता. या कार्यक्रमाच्या पाच स्पर्धकांमध्ये फायनल रंगणार असून नीलंजना, सलमान, विभूर, अंकुश आणि नितीन यांच्यामध्ये कोण जिंकणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विजेत्याला इंडियन आयडॉलची ट्रॉफी मिळणार असून 25 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच विजेत्यासोबत प्रसिद्ध म्युझिक कंपनी करार करणार आहे.