प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माची 'ती' पोस्ट व्हायरल; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 20:01 IST2023-10-03T19:59:49+5:302023-10-03T20:01:42+5:30

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ​​​​

Anushka Sharma Post Goes Viral Amidst Pregnancy rumors | प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माची 'ती' पोस्ट व्हायरल; म्हणाली...

Anushka Sharma

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत अद्याप अनुष्का आणि विराटकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानच अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यातच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. 

अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे.  ज्यात लिहिले की, 'जेव्हा तुम्हाला समजेल की प्रत्येक मत हे वैयक्तिक इतिहासाने भरलेला एक दृष्टीकोन आहे, तेव्हा तुम्हाला हे समजण्यास सुरवात होईल, की सर्व निर्णय एक कबुलीजबाब आहे'.  या स्टोरीवरुन तिच्या प्रेग्नन्सीअफवांकडे एक इशारा म्हणून पाहिली जात आहे.

काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर दिसले होते आणि पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले होते. अशा परिस्थितीत अनुष्का आणि विराटने पापाराझींना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती.  प्रेग्नेंसीमुळे अनुष्का बऱ्याच दिवसांपासून पब्लिक अपिअरन्स देत नाहीये. अंबानींच्या गणेश चतुर्थीच्या सेलिब्रेशनलाही ती आली नव्हती. आता चाहते या जोडप्याच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. 

विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती.  लग्नानंतर चार वर्षांनी २०२१मध्ये अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. वामिका असं विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव आहे. आता पुन्हा ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  

Web Title: Anushka Sharma Post Goes Viral Amidst Pregnancy rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.