चित्रपटगृहात कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही, २२ वर्ष अडकला सेन्सॉर बोर्डात, जाणून घ्या का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:40 IST2025-01-01T12:39:54+5:302025-01-01T12:40:35+5:30
सिनेमाची कथा ही पुण्यात घडलेल्या एका सत्य घटनेने प्रेरित होती.

चित्रपटगृहात कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही, २२ वर्ष अडकला सेन्सॉर बोर्डात, जाणून घ्या का?
Anurag Kashyap : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप हा ओळखला जातो. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुरागने दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटाची एक वेगळीच चर्चा रंगलेली असते. तो नेहमीच ऑफबीट चित्रपटासाठी ओळखला जातो. त्याचा असाच एक जबरदस्त कथा असलेला सिनेमा आहे, जो अद्याप थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकलेला नाही. या सिनेमाची कथा ही पुण्यात घडलेल्या एका सत्य घटनेने प्रेरित होती.
अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली बनलेले गँग्स ऑफ वासेपूर सारखे चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केले होते. पण, त्याचा पहिला चित्रपट 'पाँच' (2003) वर संवेदनशील विषय, अपमानास्पद भाषा आणि हिंसाचारामुळे CBFC ने बंदी घातली होती. दरम्यान, 22 वर्षांनंतर या चित्रपटाला CBFC कडून मंजुरी मिळाली आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.
विशेष म्हणजे सिनेमात अनेक दिग्गज कलाकार होते. ज्यामध्ये केके मेनन, तेजस्वी कोल्हापुरी, शरत सक्सेना, आदित्य श्रीवास्तव आणि विजय मौर्य यांसारख्या सिने कलाकारांच्या नावांचा समावेश होता.
अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'पाँच' हा चित्रपट 1976-77 मध्ये पुण्यात जोशी-अभ्यंकर (Joshi Abhyankar Case) यांच्या हत्याकांडावर आधारित आहे. 1976 मध्ये दहा खूनांनी पुणे शहर हादरले होते. कला महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच युवकांनी अतिशय क्रूरपणे अनेकांचे खून केले. राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. गुन्हेगाराला पकडण्यासाठी CRPF देखील तैनात करण्यात आले होते. ही घटना पुणेकर अजूनही विसरू शकत नाहीत.