"मला विराट कोहलीवर बायोपिक करायचा नाही"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:00 IST2025-09-15T11:59:42+5:302025-09-15T12:00:17+5:30

विराट कोहलीवर कधीच बायोपिक करणार नाही, असं मोठं विधान अनुरागने केलं आहे. काय आहे यामागचं कारण?

anurag kashyap dont want to make biopic on virat kohli interview viral | "मला विराट कोहलीवर बायोपिक करायचा नाही"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, कारणही सांगितलं

"मला विराट कोहलीवर बायोपिक करायचा नाही"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, कारणही सांगितलं

अनुराग कश्यप हा भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक. अनुरागने विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांंचं मन जिंकलंय. अशातच क्रिकेटर विराट कोहलीवर अनुराग बायोपिक बनवणार का, अशी चर्चा होती. त्यामुळे विराट कोहलीच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच अनुरागने मात्र मी विराट कोहलीवर बायोपिक करणार नाही, असं ठाम विधान केलंय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाला अनुराग जाणून घ्या.

अनुरागला करायचा नाही कोहलीचा बायोपिक, कारण...

फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीवर बायोपिक बनवणं तुला आवडेल का, असा प्रश्न दिग्दर्शक अनुराग कश्यपला विचारण्यात आला. त्यावेळी अनुरागने हे स्पष्ट केले आहे की, तो भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीवर बायोपिक बनवणार नाही. यामागचं कारण देताना अनुराग म्हणाला की, "विराट कोहली हा आधीच खूप लोकांचा, विशेषतः मुलांचा, आदर्श आहे. मला बायोपिक करायची असेल, तर मी एखादा कठीण विषय निवडेल. आणि एखाद्या अज्ञात व्यक्तीवर बायोपिक करेल." अशाप्रकारे अनुरागने त्याच्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या. 



पुढे अनुराग कश्यपने विराट कोहलीचं कौतुक करताना सांगितलं की, ''विराट खूप चांगला व्यक्ती आहे. मी त्याला खूप चांगला ओळखतो. तो खूप प्रामाणिक व्यक्ती आहे. तो खूप इमोशनल असून तो एक अविश्वसनीय व्यक्ती आहे.'' अशाप्रकारे अनुरागने विराट कोहलीवर बायोपिक का बनवणार नाही हे सांगितलंच शिवाय त्याचं कौतुकही केलं. अनुरागची निर्मिती असलेला जुगनुमा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. याशिवाय त्याचं दिग्दर्शन असलेला 'निशांची' हा सिनेमा या शुक्रवारी १९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Web Title: anurag kashyap dont want to make biopic on virat kohli interview viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.