मुलींची हत्या अन् मग करतो असं काही...; 'दृश्यम'पेक्षाही खतरनाक सस्पेन्स! 'हा' चित्रपट पाहून अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:48 IST2025-11-13T18:44:10+5:302025-11-13T18:48:16+5:30
'दृश्यम'पेक्षाही खतरनाक सस्पेन्स! 'हा' चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवेल

मुलींची हत्या अन् मग करतो असं काही...; 'दृश्यम'पेक्षाही खतरनाक सस्पेन्स! 'हा' चित्रपट पाहून अंगावर येईल काटा
Bollywood Movie: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम या चित्रपटाबद्दल आजची तितकंच बोललं जातं. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची समीकरणं बदलणाऱ्या सिनेमाचे दोन्ही भाग गाजले. उत्कंठावर्धक कथा, कलाकारांचा अभिनय, क्लायमॅक्स आणि एकामागोमाग येणार ट्विस्ट यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मात्र,अशाच एका चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. जो सस्पेन्सच्या बाबतीत दृश्यमलाही टक्कर देतो.
अभिनेता अजय देवगण आणि श्रिया सरन स्टार ‘दृश्यम’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अगदी वर्षभरातच २०१६ मध्ये, एक सायको-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला होता.या चित्रपटात इंडस्ट्रीतील दोन मोठे कलाकार झळकले. या चित्रपटात असे अनेक ट्विस्ट आहेत, जे तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.या चित्रपटाचं नाव 'रमन राघव 2.0' आहे.
या सायको थ्रिलर सिनेमातविकी कौशलची मुख्य भूमिका आहे. 'रमन राघव २.०' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने सिरीयल किलर रमनची भूमिका साकारली होती, जो मुलींची हत्या करून त्यांचा बलात्कार करायचा. या चित्रपटात विकी कौशल एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. जो या सिरिअर किलरच्या शोधात असतो.
कथानक
रमन आधीच पोलिसांना सरेंडर करतो आणि त्याच्या गुन्ह्याची कबुली देतो. रमन तुरुंगातून सुटून पळून जातो आणि तो त्याच्या बहिणीच्या घरी जातो. तिथे गेल्यानंतर तो त्याच्या बहिणीचा, भावाचा आणि त्याच्या पुतण्याचा खून करतो. त्यानंतर तो पुन्हा मुलींची हत्या आणि बलात्कार करतो. त्यानंतर रमनला राघवनच्या लव्हलाईबद्दल समजतं. मग रमन स्वत पोलिसांना सरेंडर करतो.पण ,तो पुन्हा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होतो आणि पळून जातो.
या चित्रपटाचा क्लायमॅक्स डोकं चक्रावणारा आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं आहे. हा चित्रपट Zee 5 वर उपलब्ध आहे.