"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 10:01 IST2024-11-25T09:59:54+5:302024-11-25T10:01:14+5:30
अनुपम खेर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. एका कार्यक्रमात अनुपम खेर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना भेटले.

"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी(२३ नोव्हेंबर) लागला. राज्यातील जनतेने सत्तेत असलेल्या महायुतीला पू्र्ण बहुमत दिलं. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला जनतेने कौल दिला. या निवडणूक निकालानंतर बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
अनुपम खेर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. एका कार्यक्रमात अनुपम खेर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना भेटले. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलाच्या लग्नाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. तिथे अनुपम खेरही उपस्थित होते. या भेटीनंतर अनुपम खेर यांनी खास पोस्ट लिहित विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे.
"नव्याने विजयी झालेल्या एकनाथ शिंदेजी आणि डायनामिक देवेंद्र फडणवीसजी यांची लग्नात भेट झाली. अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. सर्वांचं अभिनंदन...जय हो, जय महाराष्ट्र!", असं म्हणत अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.