‘थप्पड’ फ्लॉप होताच बिथरला दिग्दर्शक; दिल्या अश्लिल शिव्या, मग मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 14:00 IST2020-03-08T14:00:00+5:302020-03-08T14:00:02+5:30

नुकताच तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा सिनेमा रिलीज झाला. समीक्षकांनी या चित्रपटाला भरभरून दाद दिली. पण पब्लिक...?  पब्लिकने मात्र सिनेमाकडे पाठ फिरवली.

anubhav sinha tweets in abusive language after low collection of taapsee pannu starrer thappad-ram | ‘थप्पड’ फ्लॉप होताच बिथरला दिग्दर्शक; दिल्या अश्लिल शिव्या, मग मागितली माफी

‘थप्पड’ फ्लॉप होताच बिथरला दिग्दर्शक; दिल्या अश्लिल शिव्या, मग मागितली माफी

ठळक मुद्देअनुभव सिन्हा यांच्यासारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाचे हे वागणे पाहून अनेकांना धक्का बसला.

नुकताच तापसी पन्नूचाथप्पड’ हा सिनेमा रिलीज झाला. समीक्षकांनी या चित्रपटाला भरभरून दाद दिली. पण पब्लिक...?  पब्लिकने मात्र सिनेमाकडे पाठ फिरवली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने निराशा केली. पण कदाचित हे अपयश ‘थप्पड’चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा पचवू शकले नाही. चित्रपट ‘फ्लॉप’ होताच अनुभव सिन्हा असे काही सैरभैर झालेत की, ‘थप्पड’वर टीका करणा-यांना त्यांनी अश्लिल शिव्या देणे सुरु केले. अर्थात नंतर त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी माफीही मागितली.

तर हे प्रकरण काय ते जाणून घेऊ. त्याचे झाले असे की, ‘ऑडियन्सने थप्पड को लगाया करारा थप्पड,’ अशा हेडिंगखाली एक बातमी एका प्रकाशित झाली. दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांना हे आवडले नाही आणि त्यांनी यावर ट्वीट केले. अनुभव सिन्हांची या ट्वीटवर नजर पडली. मग काय, अनुभव सिन्हा जाम संतापले. ते सोशल मीडियावर असे काही व्यक्त झालेत की, त्यांनी शिव्यांची नुसती बरसात केली.


ते इथेच थांबले नाही तर पुढच्या ट्वीटमध्ये त्यांनी आया-बहिणींच्या शिव्याही दिल्यात.

अनुभव सिन्हा यांच्यासारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाचे हे वागणे पाहून अनेकांना धक्का बसला. पत्रकार स्मिता शर्मा यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘अनुभव सिन्हा उत्तम चित्रपट बनवतात. वेगळे विचार मांडतात. मी त्यांची चाहती आहे. पण मी त्यांच्या शिव्यांची चाहती नाही,’ असे स्मिता शर्मा यांनी लिहिले. स्मितांच्या या ट्वीटनंतर अनुभव सिन्हांनी लगेच क्षमायाचना केली. मी सर्व महिला व चाहत्यांची माफी मागतो, असे ते म्हणाले.

Web Title: anubhav sinha tweets in abusive language after low collection of taapsee pannu starrer thappad-ram