कायमचा निरोप! राज कुंद्राचं आणखी एक ट्वीट, see you again म्हणत झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 16:18 IST2023-10-20T16:17:30+5:302023-10-20T16:18:29+5:30
राज कुंद्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कायमचा निरोप! राज कुंद्राचं आणखी एक ट्वीट, see you again म्हणत झाला भावूक
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने (Raj Kundra) रात्री एक ट्वीट केलं. 'आम्ही वेगळे होतोय' अशा आशयाचं ते ट्वीट होतं. तेव्हा राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी घटस्फोट घेत आहेत का या चर्चा सुरु झाल्या. पण आता यावरुन पडदा उठला आहे. राज कुंद्राने आणखी एक ट्वीट करत आधीच्या ट्वीटमागचं सत्य उघड केलं आहे.
राज कुंद्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो वेगवेगळ्या प्रकारचे मास्क घालताना दिसला. आता या मास्कपासून त्याची सुटका झाली आहे. मात्र मास्क नाही म्हणून तो भावूक झाल्याचंही दिसून येत आहे. तो लिहितो,'फेअरवेल मास्क..आता वेगळं होण्याची वेळ आली आहे. दोन वर्षांपासून माझी सुरक्षा केलीस... आता मी नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. #UT69
Farewell Masks …it’s time to separate now! Thank you for keeping me protected over the last two years. Onto the next phase of my journey #UT69 🙏🎭🥹 🧿😇❤️ pic.twitter.com/svhiGS8aHt
— Raj Kundra (@onlyrajkundra) October 20, 2023
राज कुंद्रा स्वत:च्याच आयुष्यावर सिनेमा घेऊन येत आहे. UT 69 असं सिनेमाचं नाव आहे. पॉर्नोग्राफी केसप्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. त्याची जामिनावर सुटका झाली. मग मात्र तो कायम मास्क घालूनच फिरला. आजपर्यंत त्याने चेहरा दाखवला नाही. आता सिनेमाच्या निमित्ताने त्याने आपल्या मास्कला कायमचा निरोप दिला आहे.