Rahul Gandhi: राहुल गांधींच्या यात्रेत आणखी एक अभिनेत्री, स्टाइलमध्ये दिसली रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:17 IST2022-11-17T15:15:09+5:302022-11-17T15:17:44+5:30
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये लोकांचा चांगला सहभाग दिसत असून सोशल मीडियावरही त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. नांदेड, हिंगोली, वाशिमनंतर आता बुलडाणा जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पोहोचली आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या यात्रेत आणखी एक अभिनेत्री, स्टाइलमध्ये दिसली रिया
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात आगमन झालं. त्यावेळी, बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह भारत जोडो यात्रेत सहभागी झाला होता. विशेष म्हणजे नांदेड मधील भाषणात बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह याने एक कविताही ऐकवली. या कवितेला उपस्थितांनी जोरदार दादही दिली. तत्पूर्वी अभिनेत्री पूजा भट राहुल गांधींसोबत हैदराबादेत भारत जोडा यात्रेत चालताना दिसून आली होती. आता, बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्रीने राहुल गांधींसोबत यात्रेत सहभाग घेतला आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये लोकांचा चांगला सहभाग दिसत असून सोशल मीडियावरही त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. नांदेड, हिंगोली, वाशिमनंतर आता अकोला, बुलडाणा जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पोहोचली आहे. बुलडाण्यातील शेगाव येते मोठ्या दिमाखात राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी, काँग्रेसकडून मोठं नियोजन करण्यात येत असून सोनिया गांधींचीही उपस्थिती राहणार असल्याचं समजतं. तत्पूर्वी यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधींनी स्वा. सावरकर आणि आरएसएसवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राहुल गांधींवर भाजपकडून जोरदार टीका होत आहे. त्यातच, अभिनेत्री रिया सेन आज राहुल गांधींसोबत पायी चालताना दिसून आली.
Celebrities joining in to support the Yatra is becoming a common sight!
— Bharat Jodo (@bharatjodo) November 17, 2022
We welcome actress Riya Sen @Ri_flect as she joins @RahulGandhi on #BharatJodoYatra. pic.twitter.com/LDyOHLLG1P
पातुर येथून रिया सेन राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. रियाने भगवा आणि हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला असून डोळ्यावर गॉगलही घातला होता. राहुल गांधींसोबत अभिनेत्री रिया सेनसोबतही यात्रेतील सहभागी सेल्फी घेताना दिसून येतात. सोशल मीडियावर रिया सेनचे राहुल गांधींसोबत यात्रेत सगहभागी झाल्याचे फोटो समोर आले आहेत.
लव्ह यू हमेशा या चित्रपटातून रियाने बॉलिवूडमध्ये डेब्यु केलं होतं. तर, २००१ मध्ये आलेल्या 'स्टाइल' चित्रपटातूनही ती झळकली होती.