ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 18:45 IST2023-11-20T18:44:25+5:302023-11-20T18:45:25+5:30
सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे.

ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता
संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित Animal सिनेमाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. रणबीरचा कपूरचा (Ranbir Kapoor) अँग्री लूक आणि बॉबी देओलचा (Bobby Deol) किलर लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. अद्याप सिनेमाचा ट्रेलर आलेला नसल्याने नेमकी स्टोरी काय असेल याचा चाहते केवळ अंदाज बांधत आहेत. मात्र आता सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे.
दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी स्वत: सिनेमाचं आणखी एक पोस्टर शेअर करत रिलीज डेटची घोषणा केली आहे. पोस्टरमध्ये रणबीर कपूर लांब केस वाढलेली दाढी अशा लूकमध्ये दिसत आहे. तर त्याच्या हातात स्क्रीप्ट आहे. समोर स्वत: संदीप वांगा रेड्डी उभे आहेत. ट्रेलर आऊट ऑन 23 नोव्हेंबर असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
नुकतंच रणबीर कपूर आणि बॉबी देओल दुबईत सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. तेथील प्रसिद्ध बुर्ज खलिफावर सिनेमाचा टीझर दाखवण्यात आला. ते दृश्य पाहून रणबीर आणि बॉबीही भारावलेले दिसले. याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Animal १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना ही फ्रेश जोडी दिसणार आहे. तर अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. बॉबी देओलने खलनायक साकारला आहे.