Ranbir Kapoor : रणबीर कपूरने सुरू केलं ‘अॅनिमल’चं शूटींग, सेटवरचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:15 IST2022-11-24T13:14:00+5:302022-11-24T13:15:26+5:30
Animal Look Leaked Ranbir Kapoor Intense Look : रणबीर कपूरचा इंटेन्स लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

Ranbir Kapoor : रणबीर कपूरने सुरू केलं ‘अॅनिमल’चं शूटींग, सेटवरचा फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) नुकताच बाप झाला. अर्थात लेकीच्या जन्मानंतर रणबीर कपूर कामावर परतला आहे. सध्या रणबीर ‘अॅनिमल’ ( Animal ) या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या सेटवरचा रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
फोटोत रणबीरच्या चेहऱ्यावर घाव दिसत आहेत. वाढलेले लांब केस, लांब दाढी अन् रक्ताने माखलेले कपडे असा त्याचा लुक आहे. साहजिकच, त्याचा हा इंटेन्स लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
#RanbirKapoor new look from #Animalpic.twitter.com/nbVSQr5g9u
— Indian Box Office (@box_oficeIndian) November 23, 2022
रणबीरचं ट्रान्सफॉर्मेशन गजब आहे. हा सिनेमा सिंगल स्क्रिन्सवर आग लावेल, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
याआधी एका मुलाखतीत रणबीरने ‘अॅनिमल’ का निवडला, याचं कारण सांगितलं होतं. या सिनेमाची स्क्रिप्ट वाचून मी घाबरलो होतो आणि तेवढाच तो करायला उत्सुकही होतो. हा सिनेमा म्हणजे कन्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा अनुभव आहे. म्हणून मी हा सिनेमा निवडला, असं तो म्हणाला होता.
‘अॅनिमल’ हा सिनेमा संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित करत आहेत. संदीप रेड्डी वांगा यांनी याआधी ‘कबीर सिंग’ हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. ‘अॅनिमल’ हा एक क्राईम ड्रामा आहे. यात रणबीर ग्रे कॅरेक्टर साकारणार आहे. या सिनेमात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना रणबीरसोबत झळकणार आहे. बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
हे वर्ष रणबीरसाठी अनेकार्थाने खास ठरलं. याच वर्षात त्याचं लग्न झालं. याच वर्षात तो बाबा झाला आणि याच वर्षात त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.