'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रोमँटिक गाणं रिलीज; रणबीर-रश्मिकाच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 12:43 IST2023-10-11T12:39:50+5:302023-10-11T12:43:04+5:30

'अ‍ॅनिमल' सिनेमातील पहिलं गाणं 'हुआ मैं' रिलीज झालं आहे.

Animal First Hua Mai Song Out Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Liplock And Chemistry On Fire | 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रोमँटिक गाणं रिलीज; रणबीर-रश्मिकाच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

Ranbir Kapoor And Rashmika Mandanna

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. सिनेमातील पहिलं गाणं  'हुआ मैं' रिलीज झालं आहे. यामध्ये रणबीर आणि रश्मिका लिपलॉक करताना दिसत आहेत. या गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. प्रदर्शित होताच हे गाणं काही मिनिटात व्हायरल झालंय.

 'हुआ मैं'  गाण्याची सुरुवात रणबीर-रश्मिकाच्या लिप लॉकपासून सुरू होते. दोघेही एकमेंकावरील प्रेम रश्मिकाच्या कुटूंबासमोर जाहीर करतात. रश्मिकाने यामध्ये साधी साडी नेसली आहे. त्यात खूपच सुंदर दिसत आहे. तर रणबीर क्लीन-शेव्हमध्ये  खूपच आकर्षक दिसतोय. या गाण्याचे बोल मनोज मुंतशीर शुक्ला यांनी लिहिली आहेत. तर राघव चैतन्य आणि प्रितम यांनी गायलीत. गाण्याचं पिक्चरायझेशन जबरदस्त आहे. हे गाणे पाहून आता चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

'अॅनिमल' हा सिनेमा 'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओलची भूमिका आहे. बॉबी यामध्ये खलनायकाचे पात्र साकारतोय. १ डिसेंबरला हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होतोय.
 

Web Title: Animal First Hua Mai Song Out Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Liplock And Chemistry On Fire