...तर आज अनुष्का शर्माची वहिनी असती तृप्ती डिमरी; पण जास्त काळ टिकलं नाही नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:47 IST2023-12-08T15:43:36+5:302023-12-08T15:47:08+5:30
रणबीरबरोबर इंटिमेट सीन्स दिल्यामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी चर्चेत आली आहे.

...तर आज अनुष्का शर्माची वहिनी असती तृप्ती डिमरी; पण जास्त काळ टिकलं नाही नातं
अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'ॲनिमल' चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात रणबीरबरोबर इंटिमेट सीन्स दिल्यामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्या फॉलोवर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या ती खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. याला कारणही तसेच आहे. तृप्ती डिमरीने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाला डेट केलेलं आहे.
तृप्ती डिमरी ही अनुष्का शर्माचा भाऊ आणि चित्रपट निर्माता कर्णेश शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. पण, तृप्तीने कर्णेशसोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामुळे दोघांच्या अफेअरवर शिक्कामोर्तबही झाले होते. पण, त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाही. ब्रेकअपनंतर दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून एकमेंकासोबतचे फोटो काढून टाकले होते.
तृप्तीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्या, तिने 2017 मध्ये पोस्टर बॉईज या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती ‘बुलबुल’ चित्रपटात देखील दिसली होती. शिवाय, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'काला' मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. साजिद अली यांच्या 'लैला मजनू' या रोमँटिक चित्रपटात लैलाच्या भूमिकेतून तिने चाहत्यांची मने जिंकली. विशेष म्हणजे बुलबुल आणि काला हे दोन्ही चित्रपट कर्णेशच्या प्रॉडक्शन बॅनरखाली बनवण्यात आले होते. आगामी काळात तृप्तीकडं बरेच प्रोजेक्ट आहेत.