अनिल कपूरचा श्रीदेवी आणि जान्हवी कपूरसोबतचा फोटो का होतोय व्हायरल ? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:29 IST2019-07-31T15:24:45+5:302019-07-31T15:29:46+5:30
८० आणि ९० च्या दशकात रसिकांना या जोडीने अक्षरक्षः वेड लावलं होतं. या जोडीने जवळपास १३ सिनेमात एकत्र काम केलं आणि सगळे सिनेमा सुपरहिट ठरले.

अनिल कपूरचा श्रीदेवी आणि जान्हवी कपूरसोबतचा फोटो का होतोय व्हायरल ? वाचा सविस्तर
आपल्या झक्कास अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे अनिल कपूर. आजवर विविध चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. आजही अनिल कपूर चित्रपटसृष्टीत त्याच उत्साहाने आणि त्याच ताकदीने काम करत आहेत.
अनिल कपूरचा उत्साह आजच्या तरुण कलाकारांना लाजवेल असाच आहे. आजही अनिल कपूर चिरतरुण असल्याप्रमाणे भासतात. झक्कास, अभीं तो मैं जवान हूँ…..आजही चिरतरुण आणि वयाची ६० ओलांडल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी दिसून येते.
सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा १९८७ सालचा मिस्टर इंडिया चित्रपटातील आणि २०१९ सालचा श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवी ही जोडी रसिकांना चांगलीच भावली. दोघांमध्ये अशी काही केमिस्ट्री होती की रसिक आपसुकच थिएटरकडे खेचले जायचे. श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्यात असं काही ट्युनिंग होतं की सेटवर जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळायचा आणि सिनेमा सुपरडुपर हिट व्हायचा. ८० आणि ९० च्या दशकात रसिकांना या जोडीने अक्षरक्षः वेड लावलं होतं. या जोडीने जवळपास १३ सिनेमात एकत्र काम केलं आणि सगळे सिनेमा सुपरहिट ठरले. त्यावेळी अनिल कपूर जसे दिसायचे तसेच ते आजही पाहायला मिळत आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाचा लवलेशही दिसत नाही. श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या जान्हवीसोबतही अनिल कपूर एखाद्या हिरोप्रमाणेच वाटत आहेत. सध्या फेसअॅपने धुमाकूळ घातला असून अनेक सेलिब्रिटींनाही याचे वेड लावले आहे. फेसअॅपचा वापरकरून तयार केलेला एक फोटो सध्या व्हायरल झालाय. यांत सलमान खान, शाहरुख खान, ऋतिक रोशन, रणबीर कपूर हे ८० वर्षांचे दिसत आहेत. मात्र या फेसअॅपचा वापर करूनही अनिल कपूर चिरतरुण आहेत असे दाखवणारे फोटोही व्हायरल होत आहेत.