अनिल कपूरने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 14:03 IST2019-01-17T13:42:02+5:302019-01-17T14:03:05+5:30

अभिनेता अनिल कपूरने मोदींची भेट घेतली आहे. याची माहिती खुद्द अनिल कपूरने त्यांच्या सोशल मीडियावर दिली आहे.

Anil Kapoor meets Prime Minister Narendr Modi and shared it on social media | अनिल कपूरने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

अनिल कपूरने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

ठळक मुद्देमोदींच्या भेटीमुळे अनिल कपूर झाला खूप उत्साहित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूडमधील तरूण कलाकार भेटले होते. यावेळी आयुषमान खुराना, विकी कौशल, आलिया भट, रणबीर कपूर, राजकुमार राव, करण जोहर व एकता कपूर यांच्यासोबत बरेच कलाकार मोदींच्या भेटीला गेले होते. या कलाकारांसोबतचा पंतप्रधानांचा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच वायरल व चर्चेत आला होता. त्यानंतर आता नुकतीच अभिनेता अनिल कपूरने मोदींची भेट घेतली आहे. याची माहिती खुद्द अनिल कपूरने त्यांच्या सोशल मीडियावर दिली आहे. 

अनिल कपूरने या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल कपूर एकमेकांसमोर बसलेले दिसत आहेत. या भेटीमुळे अभिनेता अनिल कपूर खूप उत्साहित असलेले या फोटोतून दिसते आहे. या फोटोसोबत अनिल कपूरने लिहिले की, 'मला आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली, मी त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे प्रेरीत झालो आहे. त्यांचा करिश्मा आपल्यावर नक्कीच प्रभाव टाकतो. मला खासगी भेटल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे'.
 


'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं जेव्हा कधी समोर येते त्यावेळी अनिल कपूरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता याच गाण्यावर आधारित सिनेमा येतोय आणि या सिनेमाचे ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा एक रोमाँटिक सिनेमा आहे. विधू विनोद चोप्रा यांची बहिण शैली चोप्रा या सिनेमाचे दिग्दर्शन करते आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.    

Web Title: Anil Kapoor meets Prime Minister Narendr Modi and shared it on social media