२५ गर्लफ्रेंडनंतर अनिल कपूरने सुनीता कपूरशी केलं लग्न, फिल्मी आहे त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 16:34 IST2021-05-20T14:41:20+5:302021-05-20T16:34:07+5:30

अनिलने सांगितले होते की, माझ्या एका मित्राने सुनीताला माझा नंबर दिला होता. जेणेकरून ती मला प्रँक कॉल करू शकेल.

Anil kapoor married with sunita kapoor after making 25 girlfriends | २५ गर्लफ्रेंडनंतर अनिल कपूरने सुनीता कपूरशी केलं लग्न, फिल्मी आहे त्यांची लव्हस्टोरी

२५ गर्लफ्रेंडनंतर अनिल कपूरने सुनीता कपूरशी केलं लग्न, फिल्मी आहे त्यांची लव्हस्टोरी

अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अनिल कपूरची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्यांनी 19 मे 1984 रोजी सुनिताशी लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झालेत.  त्यानिमित्ताने जाणून घेऊया अनिल कपूर आणि सुनीता यांची क्यूट लव्हस्टोरी. अनिल कपूर व सुनीता यांनी लग्नाआधी 10 वर्षे एकमेकांना डेट केले आणि एकदिवस अचानक लग्न केले.  एका मुलाखतीत अनिलने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. 


अनिल कपूरने लग्नाआधी बर्‍याच मुलींना डेट केले होते. अर्जुन कपूरला दिलेल्या मुलाखतीत अनिलने सांगितले होता, की शाळेच्या दिवसांपासून मजा करायला सुरुवात केली.  अनिलला अजिबात अभ्यास करायला आवडत नव्हता, म्हणून तो कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसायचा. त्यानंतर त्यांनी 3-4 मुलींना डेट केलं. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये 20-25 जणी त्याच्या गर्लफ्रेंड होत्या पण  सुनीता सगळ्यात बेस्ट  होती.  अनिल कपूर म्हणाला, की ती माझी मैत्रिण होती आणि आम्ही दोघांनी लग्न केलं. 


अनिलने सांगितले होते की, माझ्या एका मित्राने सुनीताला माझा नंबर दिला होता. जेणेकरून ती मला प्रँक कॉल करू शकेल. एकदा आम्ही बोललो आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्यावर भाळलो. काही आठवड्यानंतर आम्ही एका पार्टीत भेटलो. ती आमची पहिली भेट होती. पण सुनीतामध्ये असे काही होते की, मी तिच्याकडे आकर्षित झालो. आम्ही मित्र बनलो. त्यावेळी माझे ब्रेकअप झाले होते, ही गोष्टही मी तिच्याशी शेअर केली होती. यानंतर आम्ही कधी एकमेकांना डेट करू लागलो, हेच कळले नाही. आमच्यात बायॅफ्रेन्ड - गर्लफ्रेन्डसारखे काहीही नव्हते. पण प्रेम होते.


ती स्वतंत्र कुटुंबातील होती. तिचे पापा बँकर होते. ती स्वत: मॉडेलिंग करत होती आणि मी बेकार होतो. मी चेंबूरला राहायचो आणि ती नेपियनसी रोडवर. मी तिला भेटायला बसने जायचो. पण ती मला टॅक्सी घ्यायला सांगायची. माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितल्यावर, जस्ट कम ना... आय विल मॅनेज... हे तिचे उत्तर ठरलेले असायचे.

लग्नानंतर मी किचनमध्ये जाणार नाही आणि जेवण बनवणार नाही, हे लग्नाआधीच सुनीताने स्पष्ट केले होते. त्यामुळे हिच्यासोबत लग्न करायचे तर मला काहीतरी बनावे लागेल, हे मला समजून चुकले होते. मी त्याकाळात प्रचंड स्ट्रगल केले. अर्थात सुनीताकडून माझ्यावर कधीच कुठला दबाव नव्हता.
 

Web Title: Anil kapoor married with sunita kapoor after making 25 girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.