अनिल कपूर वयाच्या ६९ व्या वर्षीही दिसतो तरुण, नेटवर्थ वाचून तर व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:51 IST2026-02-25T13:51:14+5:302026-02-25T13:51:54+5:30

वर्षाला किती कमावतो अनिल कपूर?

Anil Kapoor looks young even at the age of 69 know about his networth | अनिल कपूर वयाच्या ६९ व्या वर्षीही दिसतो तरुण, नेटवर्थ वाचून तर व्हाल थक्क!

अनिल कपूर वयाच्या ६९ व्या वर्षीही दिसतो तरुण, नेटवर्थ वाचून तर व्हाल थक्क!

बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर वयाच्या ६९ व्या वर्षीही कमालीचा फिट आहे. दिवसेंदिवस त्याचं वय कमी होतंय की काय अशाच प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत असतात. गेल्या चार दशकांपासून तो आपल्या अभिनय करत आहे. एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे देऊन त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमांमधून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या अनिल कपूरची एकूण नेटवर्थ किती माहितीये का?

सेलिब्रिटी नेटवर्थ रिपोर्टनुसार,अनिल कपूरची नेटवर्थ सुमारे ४० मिलियन डॉलर्स म्हणजेच ३३० कोटी रुपये इतकी आहे. सिनेमे, फिल्म प्रोडक्शन, ब्रँड एंडॉर्समेंट, टेलिव्हिजन प्रोजेक्ट्स आणि गुंतवणूक अशा अनेक मार्गांतून तो कोट्यवधींची कमाई करतो. इतक्या वर्षांच्या मेहनतीतून त्याने चाहतावर्ग तर कमावलाच मात्र रेग्युलर इनकमही कमावली. त्याचं प्रोडक्शन हाऊनस अनिल कपूर फिल्म्स अँड कम्युनिकेशन नेटवर्कमधूनही त्याची चांगली कमाई होते.

अनिल कपूर देशातील सर्वात मोठ्या टॅक्सपेअर्स पैकी एक आहे. जीक्यू च्या रिपोर्टनुसार, दरवर्षी तो १२ कोटी कमावतो. प्रत्येक सिनेमासाठी त्याला २ कोटी मिळतात. त्याचा जुहूमध्ये मोठा बंगला आहे. शिवाय त्याच्याजवळ आलिशान गाड्या आहेत.

अनिल कपूर आगामी 'सुबेदार' मध्ये दिसणार आहे. सिनेमा ५ मार्च रोजी प्राईमवर रिलीज होत आगे. तसंच तो 'वेलकम टू जंगल'मध्येही दिसणार आहे.  अनिल कपूरचा जन्म चेंबूरमध्ये १९५६ साली झाला. त्याचे वडील सुरिंदर कपूर निर्माते होते. बोनी आणि संजय कपूर हे दोघंही त्याचे भाऊ आहेत. 

Web Title : अनिल कपूर: 69 की उम्र में भी जवान, नेट वर्थ चौंकाने वाली!

Web Summary : एवरग्रीन अनिल कपूर, 69, अपनी फिटनेस से चौंकाते हैं। उनकी कुल संपत्ति लगभग $40 मिलियन (₹330 करोड़) बताई जाती है, जो फिल्मों, प्रोडक्शन, एंडोर्समेंट और निवेश से अर्जित की गई है। वह सालाना ₹12 करोड़ कमाते हैं और प्रति फिल्म ₹2 करोड़ चार्ज करते हैं। वह 'सूबेदार' और 'वेलकम टू जंगल' में दिखेंगे।

Web Title : Anil Kapoor: Ageless at 69, Net Worth Stuns!

Web Summary : Evergreen Anil Kapoor, 69, amazes with his fitness. His net worth is reportedly around $40 million (₹330 crore), earned from films, production, endorsements, and investments. He earns ₹12 crore yearly and charges ₹2 crore per film. He will be seen in 'Subedar' and 'Welcome To Jungle'.