अनिल कपूर व सोनम कपूर थिरकले ह्या गाण्याच्या रिमेकवर, पाहा हा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:26 IST2019-01-15T19:02:56+5:302019-01-15T19:26:50+5:30
अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर यांचा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अनिल कपूर व सोनम कपूर थिरकले ह्या गाण्याच्या रिमेकवर, पाहा हा Video
अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर यांचा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील 'इश्क मिठा' हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'इश्क मिठा' गाण्यात प्रेक्षकांना अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा पंजाबी डान्स पाहायला मिळत आहे.
'गुड नाल इश्क मिठा' या गाण्याचे हे गाणे रिमेक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यात सोनमच्या आयुष्यातील एक गूपित आहे, ज्याबद्दल ती वारंवार ट्रेलरमध्ये बोलत असते असे दाखविण्यात आले आहे.
१९९४ साली विधू विनोद चोप्रा यांचा १९४२ अ लवस्टोरी हा सिनेमा प्रदर्शित केला होता. या सिनेमात 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणे होते या गाण्यावरुन सिनेमाचे नाव ठेवण्यात आले आहे. राजकुमार आणि सोनम कपूर पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. तसेच पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर सिल्वर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शैली चोप्रा करतेय तर विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी या सिनेमाची निर्मिती करतायेत. अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जूही चावला या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत. विधू विनोद चोप्राची बहिण शैली चोप्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. येत्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.