​-आणि ‘या’ प्रश्नावर युवराज झाला ‘क्निनबोल्ड’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 15:47 IST2016-11-25T15:47:07+5:302016-11-25T15:47:07+5:30

क्रिकेटपटू युवराज सिंह लवकरच मॉडेल व अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या युवी लग्नाच्या तयारीत गढून गेला आहे. ...

-And the question 'Yuvrabaj' became 'ninbold'! | ​-आणि ‘या’ प्रश्नावर युवराज झाला ‘क्निनबोल्ड’ !

​-आणि ‘या’ प्रश्नावर युवराज झाला ‘क्निनबोल्ड’ !

रिकेटपटू युवराज सिंह लवकरच मॉडेल व अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या युवी लग्नाच्या तयारीत गढून गेला आहे. पण अशातही वेळात वेळ काढून युवी अलीकडे एका चॅट शोमध्ये पोहोचला आणि यादरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाने नेमका ‘क्लिनबोल्ड’ झाला. दीपिका व किम यापैकी कोण चांगली ‘किसर’ आहे? असा प्रश्न युवीला विचारण्यात आला होता. पण या प्रश्नावर युवी असा काही ‘क्लिनबोल्ड’ झाला की, क्षणभर काय बोलावे हेच त्याला सुचेना. 
हेजलच्या प्रेमात पडण्यापूर्वी युवराज दोन बॉलिवूड अभिनेत्रींशी डेट करून चुकलाय. या दोन अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण आणि किम शर्मा. आज दीपिकाचे नाव रणवीर सिंहसोबत जोडले जाते. पण करिअरच्या सुरूवातीला दीपिका व युवराजचे प्रेम चांगलेच बहरले होते. हे लव्ह अफेअर फार काळ चालले नाही. पण चॅट शोदरम्यान युवराजने सांगितले त्यानुसार, दीपिकावर युवराज खरे प्रेम करू लागला होता. होय, दीपिकावर मी खरोखरीच प्रेम करू लागलो होतो, असे युवीने या शोमध्ये सांगितले. तेव्हा दीपिका बॉलिवूडमध्ये अगदी नवखी होती. तर युवराज प्रसिद्धीच्या शिखरावर होता. यानंतर युवीच्या आयुष्यात किम शर्मा आली. पण हे नातेही फार काळ चालले नाही. 



या दोघींबद्दलही युवराजला अनेक प्रश्न विचारण्यात आले. दीपिका व किमबद्दल विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांना युवीने बेधडक उत्तरे देत षट्कार मारलेत. पण दीपिका व किम या दोघींपैकी कोण सर्वात चांगली ‘किसर’ आहे, या प्रश्नाला मात्र युवी अडकला आणि चक्क ‘क्लिनबोल्ड’च झाला.



Web Title: -And the question 'Yuvrabaj' became 'ninbold'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.