Ananya Pandey Troll: अनन्या पांडेने गरीब मुलांसोबत काढले फोटो, लोक म्हणाले- घरी जाऊन 10 वेळेस अंघोळ करेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:44 IST2022-05-03T16:38:50+5:302022-05-03T16:44:43+5:30
Ananya Pandey Troll: अनन्या पांडे तिच्या डान्स क्लासबाहेर स्पॉट झाली. यावेळी तिने काही मुलांसोबत फोटो काढले, पण त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले.

Ananya Pandey Troll: अनन्या पांडेने गरीब मुलांसोबत काढले फोटो, लोक म्हणाले- घरी जाऊन 10 वेळेस अंघोळ करेल
Ananya Pandey Troll:बॉलिवूड अभिनेत्री अन्या पांडेचा (Ananya Pandey) सध्या स्टार लिस्टमध्ये समावेश आहे. अभिनयासोबतच तिचा फॅशन सेन्सही चाहत्यांना भुरळ घालतो. पण, अनेकदा नेपोटीझमवरुन तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता परत एकदा नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले. नुकतच तिने मुंबईत काही गरीब मुलांसोबत फोटो काढले. पण, आता यावरुनच तिला ट्रोल केले जात आहे.
गरीब मुलांसोबत काढले फोटो
अनन्या डान्स क्लासमधून बाहेर पडल्यानंतर काही गरीब मुलांनी तिला घेरले. यानंतर पॅपराझींनी अनन्याचे मुलांसोबत फोटो काढले. यावेळी मुलेही खूप खुश दिसत होती. अनन्याचे मुलांसोबतचे वागणे लोकांना आवडले, मात्र काही लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मुलांसोबत फोटो काढल्यानंतर तिने कारमध्ये बसण्यापूर्वी मुलांना खायला बिस्किटे दिली, परंतु काही लोकांना अनन्याची ही शैली आवडली नाही आणि तिला ट्रोल करणे सुरू झाले.
अशा कमेंट लोकांनी केल्या
व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'तिने घरी जाऊन 10 वेळा अंघोळ केली असेल'. दुसर्याने लिहिले, 'तिचे इतके वाईट दिवस आले आहेत की, बिस्किटे वाटावी लागतायत'. एकाने लिहीले की, 'हे बिस्किट त्याच मुलांकडून हिसकावून परत दिले आहेस का?'