बाबिलने व्हिडीओत नाव घेतल्यानंतर अनन्या पांडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- "तुझ्यासोबत मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:50 IST2025-05-05T11:50:20+5:302025-05-05T11:50:39+5:30
बाबिल खानने काल व्हिडीओत अनन्या पांडेचं नाव घेऊन बॉलिवूड फेक आहे, असा खुलासा केला. पुढे बाबिलने माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला असून सर्वांची माफीही मागितली. या सर्व प्रकरणार अनन्या पांडे काय म्हणाली?

बाबिलने व्हिडीओत नाव घेतल्यानंतर अनन्या पांडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- "तुझ्यासोबत मी..."
काल बॉलिवूडमध्ये एका गोष्टीची चांगलीच चर्चा झाली ती म्हणजे बाबिल खानची. बाबिल खानने (babil khan) एक व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड फेक आहे, असं वक्तव्य केलं. याशिवाय बॉलिवूडमधील अनन्या पांडे, शनाया कपूर, अर्जुन कपूर या कलाकारांची नावं घेतली. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा खुलासा करत बाबिलने नंतर माफीही मागितली. बाबिलने व्हिडीओत नाव घेतल्यानंतर अनन्या पांडेने (ananya pande) तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली अनन्या? जाणून घ्या.
बाबिल खानच्या व्हिडीओनंतर अनन्या पांडे काय म्हणाली?
बाबिल खानने व्हिडीओत नाव घेतल्यानंतर अनन्या पांंडेने सोशल मीडियावर बाबिलला सपोर्ट करणारी पोस्ट शेअर केली आहे. अनन्या लिहिते की, "फक्त प्रेम. तुझ्यासाठी माझी चांगली एनर्जी कायम असेल. कायम तुझ्या सपोर्टला उभी राहीन", अशी पोस्ट अनन्या पांडेने केली आहे. अशाप्रकारे अनन्या पांडेने बाबिल खानला तिचा पाठिंबा दर्शवला आहे. एकूणच या व्हिडीओ प्रकरणानंतर बाबिल खानने सर्वांची माफी मागितली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि दिग्दर्शक बाबिलला काळजी घेण्याचं आवाहन करताना दिसत असून त्याला पाठिंबा देत आहे.
बाबिलने मागितली सर्वांची माफी
बाबिल खानने व्हिडीओ शेअर केल्यानंतर टीमने एक निवेदन जारी करून त्याचे विधान स्पष्ट केले. या घटनेच्या काही तासांतच तो इंस्टाग्रामवर परतला. बाबिल खानने एक एक करून सर्वांची माफी मागितली. सोशल मीडियावर परत येताच, बाबिल खानने सर्वात आधी इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांची माफी मागितली. त्याने अर्जुन कपूर, राघव जुयाल, गौरव आदर्श, अरिजित सिंग यांच्या नावाने पोस्ट शेअर केल्या आणि त्याचे स्पष्टीकरण दिले. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, "सोशल मीडियावर इतर कोणत्याही गोष्टीत अडकण्याची त्याच्यात ऊर्जा नाही, परंतु त्याच्या मित्रांना आणि ज्यांचा तो आदर करतो त्यांना स्पष्टीकरण देणे ही त्याची जबाबदारी आहे."