VIDEO: अनन्या पांडेसोबत फोटोसाठी भिडली महिला फॅन, बघा अभिनेत्रीने काय केलं....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 11:01 IST2020-11-06T10:59:45+5:302020-11-06T11:01:58+5:30
अनन्या पांडेची एक फॅन जबरदस्तीने तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. इतकेच नाही तर मनाई केल्यावरही या फॅनने अनन्याच्या हाती तिच्या शोरूमचं कार्ड सोपवलं.

VIDEO: अनन्या पांडेसोबत फोटोसाठी भिडली महिला फॅन, बघा अभिनेत्रीने काय केलं....
अनन्या पांडेबॉलिवूडमध्ये भलेही नवीन असेल पण तिची फॅन फॉलोईंग मोठी आहे. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचा बबली अंदाज तिच्या फॅन्सना खूपच भावतो. अशात तिच्यासोबत एका फोटो क्लिक करण्याची अनेकांची इच्छा असते. अशात काही विचित्र प्रकारही घडत असतात. तिचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक फॅन जबरदस्तीने तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. इतकेच नाही तर मनाई केल्यावरही या फॅनने अनन्याच्या हाती तिच्या शोरूमचं कार्ड सोपवलं.
अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इअर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. इंडस्ट्रीतील न्यूकमर्समध्ये ती अधिक लोकप्रिय आहे. नुकतीच ती बाहेर निघाली होती. तेव्हा एका फीमेल फॅनने जबरदस्ती तिच्यासोबत फोटो काढणण्याचा प्रयत्न केला. हे बघून अनन्याच्या टीमने या महिलेला दूर करण्याचा प्रयत्न केला. यावरही महिला मानली नाही आणि परत येऊन ती अनन्याला तिचं कार्ड देऊन गेली. आणि म्हणाली माझ्या शोरूमवर येऊन जा. (ब्लू स्लिप ड्रेसमधील फोटोमुळे ट्रोल झाली अनन्या पांडे, लोक म्हणाले - गरीबांची कतरिना....)
अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'SOTY2' नंतर अनन्या 'पति पत्नी और वो', आणि 'खाली पीली' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली आहे. दोन्ही सिनेमातील तिच्या भूमिका पसंत केल्या गेल्या. अनन्याची इच्छा आहे की तिला एखाद्या अॅक्शन सिनेमात मुख्य भूमिका साकारायला मिळावी. अनन्या नुकतीच शकुन बत्राच्या सिनेमाचं गोव्यातील शूट पूर्ण करून मुंबईला परतली. या सिनेमात दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ चतुर्वेदी दिसणार आहे.