अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज, सर्वधर्म समभावचा दिला संदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 15:46 IST2025-10-26T15:45:19+5:302025-10-26T15:46:07+5:30
अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज, सर्वधर्म समभावचा दिला संदेश!
Amruta Fadnavis New Song Koi Bole Ram Ram: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी यांनी दिवाळीनिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे. अमृता फडणवीस यांचं 'कोई बोले राम राम कोई खुदाए' हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली हे नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा सुरू आहे. अमृता फडणवीस यांचा या व्हिडीओत वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. मृता यांनी लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. यात त्यांचा पंजाबी लुक लक्ष वेधून घेत आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली हे नवं गाणं रिलीज करण्यात आलंय. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केलं आहे. या गाण्याला प्रदर्शित होताच लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.
अमृता फडणवीस यांनी यापूर्वी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. त्यांनी गायलेले 'शिव तांडव स्तोत्र' देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. अमृता या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात आणि त्याच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्या बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.