तूम आ गये हो नूर आ गया है! नवऱ्यासाठी गायलेलं गाणं, सैफने गालावर किस करताच लाजली अमृता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:22 IST2025-03-26T16:21:33+5:302025-03-26T16:22:05+5:30
सैफ-अमृताचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तूम आ गये हो नूर आ गया है! नवऱ्यासाठी गायलेलं गाणं, सैफने गालावर किस करताच लाजली अमृता
बॉलिवूडमध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंहची (Amrita Singh) जोडी प्रसिद्ध होती. ८०-९० च्या दशकात अमृता आघाडीची अभिनेत्री होती. तिच्याहून तब्बल १३ वर्षांनी लहान असलेला सैफ अली खान तिच्या प्रेमात पडला. अमृताही सैफच्या प्रेमात पडली आणि त्यांनी १९९१ साली लग्न केलं. तेव्हा हे लग्न खूप चर्चेत होतं. त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलंही झाली. लग्नानंतर १३ वर्षांनी २००४ साली त्यांचा घटस्फोट झाला. पण सैफ आणि अमृता प्रेमात असताना त्यांची लव्हस्टोरी खूपच क्युट होती. एका मुलाखतीत अमृता गाणं गाते तेव्हा सैफ खूप खूश होतो आणि तिच्या गालावर किस करतो असा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंहने काही वर्षांपूर्वी सिमी गरेवालच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अमृताच्या साधेपणाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. पिवळ्या रंगाच्या साध्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तर सैफ काळ्या रंगाच्या सूट बूटात दिसत आहे. अमृता सैफसाठी 'तुम आ गये हो नूर आ गया है' या रोमँटिक गाण्याच्या काही ओळी गाते. सैफ ते ऐकून अक्षरश: आनंदी होतो आणि तिच्या गालावर किस करतो. तेव्हा अमृताही लाजते. त्यांचा हा गोड व्हिडिओ आता इतक्या वर्षांनी व्हायरल होत आहे.
I found this wholesome video of Amrita Singh singing for Saif Ali Khan on Simi Garewal's show. NGL, she sang really well.
byu/Hrithik_Ki_Patni inBollyBlindsNGossip
त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'अमृता त्या काळात किती सुंदर होती. तिने गाणंही खूप छान गायलं आहे','अमृता खूप चांगली अभिनेत्री होती','ती खूपच क्युट आणि मॅच्युअर दिसत आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सैफ आणि अमृता २००४ साली वेगळे झाले. अमृताने पुन्हा दुसरं लग्न केलं नाही. तिने दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ केला. तर दुसरीकडे सैफने २०१२ साली करीना कपूरशी दुसरं लग्न केलं. त्याला तैमूर आण जेह ही दोन मुलं झाली.