'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 12:44 IST2022-07-10T12:43:29+5:302022-07-10T12:44:12+5:30

Amitabh bachchan: आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटात झळकलेले अमिताभ बच्चन आज प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. बिग बींकडे आज आलिशान बंगले, एकाहून एक महागड्या गाड्या असल्याचं पाहायला मिळतं.

amitabh bachchan tweets for son abhishek bachchan goes viral | 'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट

'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटात झळकलेले अमिताभ बच्चन आज प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. बिग बींकडे आज आलिशान बंगले, एकाहून एक महागड्या गाड्या असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या नेटवर्थ आणि संपत्तीविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. बिग बींना अभिषेक बच्चन आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. त्यामुळे या संपत्तीवर वारसाहक्काने त्यांचा अधिकार असल्याचं स्पष्ट होतं. मात्र, अलिकडेच अमिताभ यांनी त्यांच्या वारसाविषयी एक ट्विट केलं आहे हे ट्विट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहेत

अमिताभ बच्चन कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर, विशेषकरुन ट्विटरवर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते नवनवीन ट्विट करत असतात. विशेष म्हणजे बिग बी त्यांच्या प्रत्येक ट्विटला क्रमांक देत असतात. यात अनेकदा ते त्यांच्या वडिलांच्या कवितेच्या ओळी किंवा सद्धस्थितीवर भाष्य करणारं ट्विट करत असतात. परंतु, यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कवितेच्या काही ओळी शेअर करत आपल्या खऱ्या वारसदाराविषयी भाष्य केलं आहे.

काय आहे बिग बींचं ट्विट?

अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी अभिषेक बच्चनच्या (abhishek bachchan) नावाचा उल्लेख केला आहे. तसंच त्यांचा आणि अभिषेकचा असे दोन वेगवेगळेफोटो कोलाज करुन ते पोस्ट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या काही ओळीही लिहिल्या आहेत. "माझा मुलगा माझा वारस होणार नाही, जो माझा वारस होईल तो माझा मुलगा असेल." अभिषेक तू माझा खरा वारसदार आहेस, माझा गर्व आहेस. माझा आनंद आहे," असं ट्विट बिग बींनी केलं आहे.

दरम्यान, आपल्या संपत्तीचा खरा वारसदार अभिषेक असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. बिग बींनी अभिषेक व्यतिरिक्त श्वेता नंदा ही लेकदेखील आहे. बिग बी बऱ्याचवेळा त्यांच्या दोन्ही मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत त्यांच्याविषयी लिहित असतात.
 

Web Title: amitabh bachchan tweets for son abhishek bachchan goes viral