"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 09:49 IST2025-06-10T09:49:33+5:302025-06-10T09:49:52+5:30

तुमचं वय झालंय, झोपा आता.. अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल केलं. त्यावर अमिताभ यांनी त्यांना सडेतोड उत्तर देऊन नंतर ट्विट डिलीट केलं. नेमकं काय म्हणाले बिग बी?

amitabh bachchan slam netizens who troll him because of his age tweet viral | "माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट

"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. अमिताभ यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अमिताभ सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. अमिताभ (amitabh bachchan) हे त्यांच्या x अकाऊंटवर योग्य नंबर टाकून त्यांचं खास ट्विट पोस्ट करत असतात. अमिताभ यांच्या ट्विटवर त्यांचे चाहतेही कमेंट्सचा वर्षाव करत असतात. अशातच अमिताभ बच्चन यांच्या ट्विटचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या ट्विटमध्ये बिग बींचा पारा चढला असून त्यांनी नेटकऱ्याला चांगलंच फैलावर घेतलंय. 

अमिताभ सोशल मीडियावर युजरवर का भडकले?

 अमिताभ बच्चन यांचे काही ट्विट व्हायरल झाले आहेत. बिग बींनी रात्री उशीरा काही ट्विट केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलंय. "अंधेरी रातों में शहनशाह क्यू जाग रहे हो. झोपा आता, तुमचं वय झालंय..", अशी कमेंट एका युजरने केली. त्यावर बिग बींनी त्याला उत्तर दिलं, "एक दिवस तुझंही वय होईल.. देवाची इच्छा" याशिवाय "वेळेत झोपत जा. नाहीतर तुम्हाला दीर्घायुष्य मिळणार नाही", यावर रिप्लाय करताना बिग बी म्हणाले, "माझ्या मृत्यूची गोष्ट करण्यासाठी धन्यवाद.. देवाची कृपा". अशाप्रकारे ट्रोल करणाऱ्यांना बिग बींनी चांगलंच सुनावलं. पण नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. 

amitabh-delted-tweets

अमिताभ बच्चन यांनी जरी हे ट्विट डिलीट केले तरी अल्पावधीत ते व्हायरल झाले. कितीही ट्रोल केलं तरी अमिताभ सहसा चाहत्यांना रिप्लाय देत नाहीत. त्यामुळे बिग बींनी नेटकऱ्याला स्पष्ट शब्दात रिप्लाय केल्याने त्यांच्या चाहत्यांना चांगलंच आश्चर्य वाटलं. अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ते KBC 16 चं सूत्रसंचालन करत होते. बिग बी आता पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती'च्या १७ व्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत. हा नवा सीझन लवकरच सोनी टीव्हीवर सुरु होईल. अमिताभ लवकरच 'कल्की २' सिनेमात झळकण्याची शक्यता आहे.

Web Title: amitabh bachchan slam netizens who troll him because of his age tweet viral