Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या पॅन्टमध्ये शिरतो उंदीर तेव्हा...., ‘बिग बीं’नी सांगितला मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 15:24 IST2023-02-09T15:22:45+5:302023-02-09T15:24:08+5:30
Amitabh Bachchan : बिग बींनी एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही...

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या पॅन्टमध्ये शिरतो उंदीर तेव्हा...., ‘बिग बीं’नी सांगितला मजेशीर किस्सा
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह असतात, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आपल्या फिल्मी करिअरमधील किस्स्यांपासून तर प्रेरणादायी संदेशापर्यंत असं सगळं अमिताभ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेकदा त्यांच्या पोस्ट लक्ष वेधून घेतात. आता बिग बींनी एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
तर गोष्ट आहे अमिताभ यांच्या बेल बॉटम पॅन्टची. त्याकाळी बेल बॉटमची फॅशन होती. तर याच बेल बॉटमचा एक किस्सा अमिताभ यांनी सांगितला आहे. अमिताभ यांच्या ‘दो और दो पांच’ या चित्रपटाला नुकतीच ४३ वर्षे पूर्ण झालीत. ही माहिती देताना अमिताभ यांनी या चित्रपटातील त्यांचा एक डॅशिंग लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी बेल बॉटम पॅन्ट परिधान केली आहे आणि त्यात ते ॲक्शन सीन करताना दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी या बेल बॉटम पॅन्टमागचा एक धमाल किस्सा शेअर केला आहे.
त्यांनी लिहिलं, “दो और दो पांच या चित्रपटाला ४३ वर्षं झाली. काय धमाल चित्रपट होता हा आणि त्यातील बेल बॉटम पॅन्ट. एकेदिवशी मी तशीच बेल बॉटम पॅन्ट परिधान करून एका चित्रपटगृहात चित्रपट पहायला गेलो आणि अंधारात एक उंदीर माझ्या पॅन्टमध्ये शिरला, याचं संपूर्ण श्रेय जातं त्या बेल बॉटम पॅन्ट्ला...” .
‘दो और दो पांच’ हा सिनेमा राकेश कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. फेब्रुवारी १९८० साली रिलीज झाला होता. या चित्रपटात शशी कपूर, परवीन बाबी, हेमा मालिनी, कादर खान, श्रीराम लागू असे अनेक कलाकार होते. हा त्या काळातील सुपरहिट सिनेमांपैकी एक होता.