बिग बींनी शेअर केला अभिषेकसोबतचा थ्रोबॅक फोटो; लेकासाठी लिहली एक प्रेमळ नोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:08 IST2023-09-05T11:55:22+5:302023-09-05T12:08:17+5:30
अमिताभ बच्चन यांनी अभिषेकच्या बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

Amitabh Bachchan shares throwback picture with son Abhishek
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचं आहे. बच्चन कुटुंबातील सदस्य कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चर्चा रंगत आहे. आता देखील महानायक अमिताभ बच्चन यांनी मुलासाठी खास पोस्ट केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी अभिषेकच्या बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ यांनी हातात कॅमेरा पकडलेला दिसून येत आहे. तर अभिषेक फारच क्यूट दिसत आहे. अमिताभ यांनी हा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं की, "अभिषेक तु कॅमेर्यासमोर लवकर सुरुवात केलीस.. आणि हे कायम राहो.. यासाठी माझी प्रार्थना आहे". सध्या दोघांचा हा गोड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.
अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्याचा 'घुमर' सिनेमा प्रदर्शित झाला. अभिषेकचा घूमर चित्रपट पाहून अश्रू अनावर झाल्याचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला होता. त्यांनी लिहिले होते "दोन वेळा सिनेमा पाहिला. रविवारी दुपारी आणि रात्री. तुमचा मुलगा संबंधीत गोष्टीचा भाग असेल तर ते अविश्वसनीय असतं. तुम्ही स्वतःची नजर देखील हटवू शकत नाही. सिनेमा पाहिल्यानंतर मी माझे विचार तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय स्वतःला थांबवू शतक नाही. माझे डोळे पाणावले आहेत."
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते शेवटचे ‘ऊंचाई’ या चित्रपटात दिसले होते. बिग बींनी आता त्यांचा बहुप्रतिक्षित क्विझ शो कौन बनेगा करोडपती सुरू केला आहे. सध्या ते या कार्यक्रमाचे शुटिंग करत आहेत