बिग बींनी शेअर केला रश्मिका मंदानासोबतचा फोटो, पण चाहत्यांनी ‘चूक’ शोधली ना भाऊ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:39 IST2022-03-31T17:29:13+5:302022-03-31T17:39:35+5:30
Amitabh Bachchan & Rashmika Mandanna : या फोटोत अमिताभ रश्मिका मंदानासोबत दिसत आहेत. रश्मिका खळखळून हसतेय आणि बिग बी कौतुकानं तिच्याकडे बघताहेत...

बिग बींनी शेअर केला रश्मिका मंदानासोबतचा फोटो, पण चाहत्यांनी ‘चूक’ शोधली ना भाऊ!!
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. सोशल मीडियावरही बिग बी प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. प्रत्येक लहान-मोठी गोष्ट न विसरता ते चाहत्यांची शेअर करतात. नुकताच अमिताभ यांचा ‘झुंड’ हा सिनेमा रिलीज झाला. ‘झुंड’ या चित्रपटानंतर अमिताभ साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसणार आहेत. हरिद्वारला चित्रपटाचं शूटींग सुरू झालंय. आता ही अपडेट अमिताभ चाहत्यांसोबत शेअर करणार नसतील तर नवल. त्यांनी ‘गुडबाय’च्या सेटवरचा फोटो शेअर केला.
या फोटोत अमिताभ रश्मिका मंदानासोबत दिसत आहेत. रश्मिका खळखळून हसतेय आणि अमिताभ कौतुकानं तिच्याकडे बघताहेत. हा फोटो शेअर केला आणि तो पाहून चाहते क्रेझी झालेत. ‘पुष्पा’ असं एकाच शब्दाचं कॅप्शन देत अमिताभ यांनी हा फोटो पोस्ट केला. साहजिकच या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स पूर आला.
पुष्पा नहीं सर...
अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो चाहत्यांना जाम आवडला. पण हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी केलेली एक ‘चूक’ही चाहत्यांना नेमकी खटकली. होय, ‘पुष्पा नहीं सर श्रीवल्ली’ असं लिहित अनेकांनी ही चूक बिग बींच्या लक्षात आणून दिली. ‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुनचं नाव पुष्पा होतं तर रश्मिकानं श्रीवल्लीची भूमिका साकारली होती.
रश्मिका मंदानाने अमिताभ यांनी पोस्ट केलेला हा फोटो आपल्या इन्स्टास्टोरीवर रिपोस्ट केला आहे. रश्मिका मंदाना लवकरच ती अमिताभ बच्चन यांच्या ‘गुड बाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ व रश्मिका यांच्यासह साहिल मेहता, शिवीन नारंग, नीना गुप्ता यांच्या भूमिका आहेत.