अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे त्यांचा जावई, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 12:06 IST2020-01-17T12:05:14+5:302020-01-17T12:06:03+5:30
अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत त्यांचा जावई आहे. जाणून घ्या त्यांच्या संपत्तीचा आकडा

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे त्यांचा जावई, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल अवाक्
बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या ५० वर्षांपासून अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आजही त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तुम्हाला माहित आहे का अमिताभ बच्चन जवळपास २८०० कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत. एवढी प्रॉपर्टी असतानाही अमिताभ बच्चन यांनी काम बंद केले नाही. तब्येत खराब असतानाही ते सातत्याने कार्यरत आहेत. तुम्ही हे जाणून घेतल्यावर हैराण व्हाल की अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत त्यांचा जावई आहे.
अमिताभ बच्चन यांच्या मुलीचे नाव श्वेता असून ती प्रसिद्ध बिझनेसमॅन निखिल नंदा यांची पत्नी आहे. निखिल नंदा भारतातील एक यशस्वी उद्योगपती आहेत. २२ वर्षा अगोदर १६ फेब्रुवारी १९९७ रोजी श्वेता बच्चन हिचे निखिल नंदा सोबत लग्न झाले होते. निखिल नंदा हे हिंदी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते राज कपूर यांची मुलगी रितू नंदा आणि राजन नंदा यांचा मुलगा आहे.
निखिल ‘एस्कॉर्टस लिमिटेड’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. निखिल या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील उद्योगपती आहेत. ते २०१३ साली एस्कॉर्टस मध्ये मॅनेजिंग डिरेक्टर बनले. ते १९९७ पासूनच निर्देशक मंडळाचे प्रमुख सदस्य आहेत. त्यांनी अमेरिकेतील व्हॉर्टन बिजनेस स्कुलमधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले.
निखिल बिग बींपेक्षा खूप श्रीमंत आहे. अमिताभ बच्चन २८०० कोटी रुपये इतक्या संपत्तीचे मालक आहेत. तर रिपोर्ट्सनुसार त्यांचे जावई निखिल नंदा यांची संपत्ती जवळपास ३५०० कोटी रुपये इतकी आहे. निखिल नंदा ह्यांचे नाव मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन मध्ये घेतले जाते.
अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन जवळ २४८ कोटींची मालमत्ता आहे. अभिषेक बच्चनने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न केले. ऐश्वर्या रायने आपल्या बॉलिवूड करियरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण अभिषेक बच्चन बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही.
अमिताभ बच्चनची पत्नी जया बच्चन एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांच्या जवळ १००० कोटींची मालमत्ता आहे. श्वेता व निखिल यांना दोन मुलं आहेत. मुलीचे नाव नव्या नवेली तर मुलाचे नाव अगस्त्या नंदा.