अखेर मुंबई पोलिसांनी 'डॉन'ला पकडलंच! हेल्मेट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांचा Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 15:43 IST2023-05-19T15:42:11+5:302023-05-19T15:43:31+5:30

हेल्मेट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत आहे.

amitabh bachchan posted photo of him standing near police van says arrested | अखेर मुंबई पोलिसांनी 'डॉन'ला पकडलंच! हेल्मेट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांचा Photo व्हायरल

अखेर मुंबई पोलिसांनी 'डॉन'ला पकडलंच! हेल्मेट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांचा Photo व्हायरल

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेले काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शूटिंगला जाताना ट्रॅफिकचा कंटाळा आला म्हणून एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतल्याचा फोटो त्यांनी पोस्ट केला होता. यानंतर अनेकांनी हेल्मेट घातलं नाही म्हणून त्यांना ट्रोल केलं. तसंच त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही जोर धरुन होती. सोशल मीडियावर सतत हीच चर्चा दिसत होती. आता अमिताभ बच्चन यांनी एक 'arrested' म्हणत एक फोटो पोस्ट केला आहे.

हेल्मेट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत आहे. पोलिसांच्या गाडीपाशी ते उभे आहेत. 'Arrested' असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. चेक्स शर्ट घातलेल्या बिग बींच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. खिशात हात घालून ते गाडीला टेकून उभे आहेत. 

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांना त्यांचा हा ह्युमर जाम आवडलाय. 'शेवटी काय तर डॉनला मुंबई पोलिसांनी पकडलंच' अशी कमेंट एकाने केली आहे. तर आणखी एकाने लिहिले,'सर तुम्हाला अरेस्ट करतील अशी हिंमत कोणामध्येच नाही.'

अमिताभ बच्चन यांनी हेल्मेट न घालता दुचाकीवरुन प्रवास केला होता. तर त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानेही हेल्मेट न घालता बॉडिगार्डच्या गाडीवर बसून प्रवास केला. त्यामुळे तिच्यावरही कारवाई करण्याची मागणी जोर धरुन होती.

Web Title: amitabh bachchan posted photo of him standing near police van says arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.