'या' दिशेला तोंड करून जेवतात अमिताभ बच्चन, वडील हरिवंशराय बच्चन यांचंही ऐकलं नव्हतं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:23 IST2025-01-08T10:23:28+5:302025-01-08T10:23:43+5:30
अमिताभ बच्चन जेवताना कोणते नियम पाळतात? जाणून घ्या.

'या' दिशेला तोंड करून जेवतात अमिताभ बच्चन, वडील हरिवंशराय बच्चन यांचंही ऐकलं नव्हतं!
Amitabh Bachchan Dining Table Habits : मेगास्टार अमिताभ बच्चन यांना जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक पसंत करतात. 'शोले', 'डॉन', 'जंजीर', 'शाहशाह'पासून ते 'कल्की 2898' पर्यंत त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. ८२ वर्षांचे अमिताभ आजही पडद्यावर सक्रिय आहेत. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते खाण्यापासून योगापर्यंत सर्वच बाबतीत कठोर नियम पाळतात. पण, अमिताभ बच्चन जेवताना उत्तरेकडे तोंड का करतात हे तुम्हाला माहिती आहे का? तर याबद्दल जाणून घेऊया.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकवेळा अमिताभ बच्चन स्वत: त्यांच्या कुटुंबाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करतात. अशीच त्यांची एक सवय 'कौन बनेगा करोडपती १६'च्या सेटवर स्पर्धक झारखंडच्या धनबादचा रहिवासी असलेला कौशलेंद्र याने सांगितली आहे. कौशलेंद्र यांनी हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांचे एक पुस्तक वाचले आहे. ज्यात बच्चन कुटुंबाबद्दल काही गोष्टी काही लिहलेल्या आहेत. त्या पुस्तकात हरिवंशराय बच्चन यांनी लिहिले आहे की, 'त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य नेहमी एकत्र जेवतात आणि अमिताभ बच्चन नेहमी उत्तरेकडे तोंड करून जेवणाच्या टेबलावर बसतात".
हरिवंशराय बच्चन यांनी लिहलेल्या पुस्तकाचा संदर्भ देत कौशलेंद्र यांनी सांगितलं की, हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या पुस्तकात 'काला पत्थर'च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काय घटना घडली होती, त्याचा उल्लेख केला आहे. 'काला पत्थर'च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावर दूषित पाणी फवारण्यात आल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र, अमिताभ बच्चन यांनी त्या स्थितीतही शूटिंग सुरू ठेवलं होतं. तेव्हा हरिवंशराय अमिताभ यांना म्हणाले होते की, "मला सत्याची गरज आहे, पण तुला (अमिताभ) दीर्घायुष्य हवे आहे". जेव्हा हरिवंश यांनी अमिताभ बसलेल्या जागेवर बसण्याची इच्छा होती. तेव्हा बिग बींनी त्यांना सांगितलं होते, "मला सत्याच्या किंमतीवर दीर्घायुष्य नको आहे".
आयुर्वेद आणि वास्तूमध्ये असे मानले जाते, की पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने दीर्घायुष्य मिळते. तर उत्तरेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने ज्ञान, सत्य आणि आध्यात्मिक शक्ती मिळते. अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, 'माझ्या वडिलांना नेहमीच मला दीर्घायुष्य मिळावे अशी इच्छा होती, त्यांच्यासाठी हे पुरेसे होते".