अमिताभ बच्चन झाले भावुक, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:38 IST2025-09-03T13:38:08+5:302025-09-03T13:38:33+5:30
अमिताभ बच्चन यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन झाले भावुक, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार, म्हणाले...
बॉलिवूडमधील महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक वेळा बिग बींची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर गर्दी करतात. दर रविवारी अमिताभ बच्चन हे त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटतात. गेल्या रविवारीदेखील अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी जलसा या बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती.
नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्येही काही खास फोटो शेअर केलेत. यासोबत त्यांनी लिहलं, "चाहत्यांच्या प्रेमाशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यांचे आशीर्वाद कायमच माझ्याबरोबर राहतील. मला कायमच आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक रविवारी माझ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चाहत्याप्रती माझ्या मनात प्रेम आहे. ही महानता मी कधीच विसरु शकत नाही. माझ्या पार्थनेत ते निरंतर आहेत आणि त्यांचे खूप आभार", असं त्यांनी म्हटलं.
अमिताभ हे वयाच्या ८२ व्या वर्षीही ते सतत काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियाचंही तितकंच आकर्षण आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ते व्यक्त होत असतात. अमिताभ यांचे इन्स्टाग्रामवर ३७ मिलियन फॉलोअर्स आहेत. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या 'Kalki 2898 AD' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. याशिवाय 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोचं ते सध्या सुत्रसंचालन करत आहेत.