47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 04:28 PM2023-03-26T16:28:16+5:302023-03-26T16:29:10+5:30

Amitabh bachchan and rekha: सध्या सोशल मीडियावर अमिताभ आणि रेखा यांचे काही रोमॅण्टिक फोटो व्हायरल होत आहेत.

amitabh bachchan and rekha old pics viral from 1976 film do anjaane set fans feels nostalgic | 47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क

47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि रेखा (rekha). गेल्या कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या या जोडीच्या अफेअर्सचे अनेक किस्से चर्चिले गेले. किंबहुना अद्यापही त्यांची चर्चा रंगते. यात खासकरुन त्यांच्यातील प्रेम, त्यांच्या आलेला दुरावा अशा किश्यांची चर्चा वरचेवर चाहत्यांमध्ये रंगताना दिसते. यामध्येच आता रेखा आणि बिग बी यांचे काही अनसीन फोटो समोर आले आहेत. हे फोटो जवळपास ४७ वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगण्यात येतं.

रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

सध्या सोशल मीडियावर अमिताभ आणि रेखा यांचे काही रोमॅण्टिक फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून नेटकरी थक्क झाले असून हे फोटो जवळपास ४७ वर्ष जुने आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये या फोटोंची चर्चा होताना दिसते.

व्हायरल होत असलेले फोटो 'दो अनजाने' या सिनेमाच्या सेटवरचे आहेत. या सिनेमामध्ये या जोडीने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे हे फोटो चित्रपटातील आहेत. सेंट पॉल्स स्कूल दार्जिलिंगमध्ये दो अनजाने सिनेमाचं चित्रीकरणादरम्यानचे फोटो, असं कॅप्शन देत हे थ्रोबॅक फोटो शेअर करण्यात आले आहेत.

दरम्यान, 'दो अनजाने' हा सिनेमा १९७६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रेखा, अमिताभ यांच्याव्यतिरिक्त मिथून चक्रवर्तीस प्रेम चोप्रा, ब्रह्मचारी हे कलाकार झळकले होते.
 

Web Title: amitabh bachchan and rekha old pics viral from 1976 film do anjaane set fans feels nostalgic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.