बॉलिवूड सिनेमा करायला अल्लू अर्जुन 'हो' म्हणाला, पण सांगितली एक अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 19:50 IST2022-07-18T19:49:42+5:302022-07-18T19:50:35+5:30
टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुन आता हिंदी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अल्लू अर्जुनला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले की, त्याला बॉलिवूड चित्रपटात काम करायला आवडेल का?

बॉलिवूड सिनेमा करायला अल्लू अर्जुन 'हो' म्हणाला, पण सांगितली एक अडचण
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा- द राइज’ सुपरडुपर हिट झाला. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची अर्थात ‘पुष्पा-द रूल’ (Pushpa The Rule ) या चित्रपटाची. ‘पुष्पा’साठी अल्लूनं प्रचंड मेहनत घेतली होती. संपूर्ण चित्रपटात एक खांदा वर करुन चालणं किंवा डान्स करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी अल्लू अर्जुनने 2 वर्ष मेहनत घेतली. टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुन आता हिंदी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पुष्पाच्या हिंदी वर्जनने देखील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला केला. अल्लू अर्जुनला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले की, त्याला बॉलिवूड चित्रपटात काम करायला आवडेल का?
अल्लू अर्जुनने दिलं हे उत्तर
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अल्लू अर्जुनने सांगितले की, मला यात नक्कीच इंटरेस्ट आहे. तो म्हणतो, 'हिंदीमध्ये अभिनय माझ्यासाठी थोडासा कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. पण गरज पडली तर मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनचे मुंबईत एक अपार्टमेंटदेखील आहे.
‘पुष्पा 2’बद्दलची नवी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, ‘पुष्पा 2’मध्ये फहाद फासिलनंतर विजय सेतुपती पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार ‘पुष्पा 2’ला सुपरडुपर हिट बनवण्याच्या तयारीत आहेत आणि यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. आता या चित्रपटात विजय सेतुपतीची एन्ट्री पक्की मानली जात आहे. विजय सेतुपतीच्या एन्ट्रीच्या बातमीने साहजिकच चाहते क्रेझी झाले आहेत. रिपोर्टनुसार, विजय सेतुपती या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. त्याची भूमिका फहाद फासिलसारखी असेल की वेगळी, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण यानिमित्ताने डबल धमाका होणार हे नक्की.