Allu Arjun Video: हा अ‍ॅटिट्यूड कोणाला दाखवतोस? अल्लू अर्जुनचं वागणं पाहून नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:56 PM2022-06-29T12:56:25+5:302022-06-29T12:56:54+5:30

Allu arjun: सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याला मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. परंतु, यावेळी त्याचं एक वेगळंच रुप चाहत्यांना पाहायला मिळालं.

allu arjun spotted in mumbai with his family users says etna attitude kis cheez ke leyea hai | Allu Arjun Video: हा अ‍ॅटिट्यूड कोणाला दाखवतोस? अल्लू अर्जुनचं वागणं पाहून नेटकरी संतापले

Allu Arjun Video: हा अ‍ॅटिट्यूड कोणाला दाखवतोस? अल्लू अर्जुनचं वागणं पाहून नेटकरी संतापले

googlenewsNext

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (aalu arjun) 'पुष्पा' (pushpa) या चित्रपटामुळे चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. या चित्रपटामुळे अल्लू साऊथसह बॉलिवूडमध्येही लोकप्रिय झाला. त्यामुळे वरचेवर त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे लोकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून अल्लू काही काळासाठी भारावून गेला होता. परंतु, आता त्याच्यात निर्माण झालेला अ‍ॅटिट्यूड पाहून नेटकऱ्यांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत. सध्या सोशल मीडियावर अल्लूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याला मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. परंतु, कुटुंबासोबत असलेल्या अल्लूचं एक वेगळंच रुप चाहत्यांना पाहायला मिळालं. दरवेळी प्रत्येक चाहत्यासोबत आदबीने वागणारा अल्लू यावेळी चाहत्यांकडे ढुमकूनही पाहत नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनला पाहिल्यानंतर चाहते आणि प्रसारमाध्यमे त्याची एक झलक टिपण्यासाठी वा त्याच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, यावेळी अल्लूने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. इतंकच नाही तर कोणतीही प्रतिक्रिया न देता सरळ गाडीत जाऊन अॅटिट्यूडमध्ये बदला. जे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले नेटकरी?

'भावा हा अ‍ॅटिट्यूड कोणाला दाखवतोस',' साऊथ स्टार तर खूप चांगले असतात ना?', 'हा अ‍ॅटिट्यूड कशामुळे आलाय?', असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली. २०२१ मध्ये अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई  केली. सध्या अल्लू या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये बिझी आहे. या सिक्वलचं ना 'पुष्पा: द रुल' असं असणार आहे.

Web Title: allu arjun spotted in mumbai with his family users says etna attitude kis cheez ke leyea hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.