'पुष्पा'ने Allu Arjunला यशाच्या शिखरावर पोहोचवले, Prabhasचा रेकॉर्ड मोडत ठरला महागडा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 17:31 IST2022-10-18T17:23:15+5:302022-10-18T17:31:16+5:30
साऊथचे हे सुपरस्टार प्रत्येक प्रोजेक्टसाठी फीस घेताता हे जाणून घ्या.

'पुष्पा'ने Allu Arjunला यशाच्या शिखरावर पोहोचवले, Prabhasचा रेकॉर्ड मोडत ठरला महागडा अभिनेता
Highest Paid Actors Of Tollywood:गेल्या काही काळापासून साऊथ फिल्म इंडस्ट्री (South Film Industry)तील चित्रपट बॉक्स ऑफिस (Box Office) वर चांगला बिझनेस करत आहेत. आता टॉलिवूडची जादू दाक्षिणात्य प्रेक्षकांबरोबरच हिंदी पटलावरही चालू लागली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'बाहुबली सीरीज' आणि 'पुष्पा: द राइज' सारखे उत्तम चित्रपट, ज्यांनी शानदार कलेक्शन केले. या चित्रपटांच्या यशामध्ये प्रभास आणि अल्लू अर्जुन सारख्या अनेक स्टार्सची लोकप्रियता देखील सामील आहे, ज्यांच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हे स्टार्स प्रत्येक प्रोजेक्टसाठी फीस घेताता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
किती फीस घेतो प्रभास
चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत प्रभासचे नाव सामील आहे. प्रभास त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटासाठी संपूर्ण 120 कोटी रुपये घेतले आहेत.
अल्लु अर्जुनचं मानधन
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सच्या यादीत प्रभाससोबत अल्लू अर्जुनचेही नाव आहे. अल्लू अर्जुनने 'पुष्पा: द राइज'साठी 60 कोटी रुपये घेतले होते. या चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याची फी दुप्पट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन 'पुष्पा२'साठी 125 कोटी रुपये घेत आहे. असे झाले तर अल्लू अर्जुन हा टॉलिवूडचा सर्वाधिक मानधन घेणारा स्टार बनेल.
अन्य कलाकारांचं मानधन
प्रभास (Prabhas) आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) व्यतिरिक्त महेश बाबू 70 कोटी घेतात, तर पवन कल्याण एका चित्रपटासाठी 50 ते 65 कोटी घेतात. यासह, ज्युनियर एनटीआर 30 ते 80 कोटी रुपये आणि चिरंजीवी 50 कोटी रुपयांपर्यंत फीस घेतो. यासह राम चरण आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी 30 ते 70 कोटी इतकी मोठी रक्कम घेतात.