पुष्पानंतर अल्लू अर्जुन झाला मालामाल, बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी घेतली जबदरस्त रक्कम; प्रभासला ही टाकलं मागं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:31 IST2023-03-10T15:48:06+5:302023-03-10T16:31:56+5:30

अल्लू अर्जुनने एका बॉलिवूड चित्रपटासाठी इतकी फी घेतली आहे की ती रक्कम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आता अल्लू अर्जुनने प्रभासचाही रेकॉर्ड मोडला आहे.

Allu arjun charges whopping amount 125 crore for bollywood film beats prabhas | पुष्पानंतर अल्लू अर्जुन झाला मालामाल, बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी घेतली जबदरस्त रक्कम; प्रभासला ही टाकलं मागं

पुष्पानंतर अल्लू अर्जुन झाला मालामाल, बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी घेतली जबदरस्त रक्कम; प्रभासला ही टाकलं मागं

 साऊथ सिनेसृष्टीतील पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन (Allu Arjun) बॉलिवूडमध्ये गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आता अशी बातमी येत आहे की अल्लू अर्जुनने एका बॉलिवूड चित्रपटासाठी इतकी फी घेतली आहे की ती रक्कम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आता अल्लू अर्जुनने फी घेण्याच्या बाबतीत प्रभासला मागे टाकले आहे.


अल्लू अर्जुनने प्रभासला टाकले मागे
तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील सूत्रांनी IndiaToday.in ला सांगितले की अल्लू अर्जुनने टी-सीरीजच्या निर्मिती असलेल्या चित्रटासाठी मोठी रक्कम आकारली आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेत्याने 125 कोटी रुपये घेतले आहेत. सूत्रांनी सांगितले की, प्रभास एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेत असे, मात्र आता अल्लू अर्जुनने फी घेण्याच्या कारणावरून प्रभासला मागे टाकून नवा ट्रेंड सेट केला आहे.

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनने निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबत एक मोठा प्रोजेक्ट साईन केल्याची माहिती आहे. मात्र, या चित्रपटाचे टायटल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्स यांनी केली आहे.

चाहत्यांना 'पुष्पा२'ची प्रतीक्षा
अल्लू अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो 'पुष्पा: द राइज' या 'पुष्पा: द राइज'च्या सिक्वेलला घेऊन चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्यासोबत फहद फासिल, रश्मिका मंदान्ना हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 
 

Web Title: Allu arjun charges whopping amount 125 crore for bollywood film beats prabhas