'जवान' ट्रेलरमधील शाहरुखच्या व्हायरल डायलॉगवर आलियाचं उत्तर, वाचा, ती काय म्हणाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 14:54 IST2023-09-01T14:53:32+5:302023-09-01T14:54:32+5:30
'जवान' चित्रपटातील कलाकारच नाही तर अभिनेत्री आलिया भट्ट देखील चर्चेत आली आहे.

Alia Bhat
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरनेच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे फक्त 'जवान'च चित्रपटाची चर्चा आहे. केवळ चित्रपटातील कलाकारच नाही तर अभिनेत्री आलिया भट्ट देखील चर्चेत आली आहे. आलिया भट्ट कदाचित शाहरुख खानच्या जवानमध्ये नसेल. पण तिच्या नावाचा डायलॉग इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
जवानच्या ट्रेलरमध्ये जेव्हा शाहरुख खान उर्फ जवानला विचारले जाते, तुला काय हवे आहे? तर तो उत्तर देतो, “पाहिजे तर आलिया भट्ट.” या डायलॉगवरील मीम्स आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर खुद्द आलियाने प्रतिक्रिया दिली आहे. आलिया भट्टनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर जवानच्या ट्रेलरवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले, "आणि संपूर्ण जगाला फक्त SRK हवा आहे!!!"
बॉलीवूड सेलिब्रिटी जवानच्या पॉवरपॅक ट्रेलरचे कौतुक करताना थकत नसल्याचे दिसून येत आहे. आलिया भट्ट आणि शाहरुख खान 'डियर जिंदगी'मध्ये एकत्र दिसले होते. तर आलिया भट्टनेही शाहरुखच्या प्रोडक्शनसोबत डार्लिंग्सची सहनिर्मिती केली आहे.
शाहरुख खान व्यतिरिक्त, चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत, तर दीपिका पदुकोण विशेष भूमिकेत, तसेच सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिका आहेत.हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत विक्रम मोडत आहे.