Ranbir -Alia wedding: आलियासोबत लग्न केल्यानंतर असा आहे रणबीरचा पुढचा प्लान, जाणून घ्या काय करणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:18 IST2022-04-13T12:24:16+5:302022-04-13T19:18:11+5:30
मीडिया रिपोर्टनुसार लग्नानंतर रणबीर कपूर ब्रेक घेणार आहे.

Ranbir -Alia wedding: आलियासोबत लग्न केल्यानंतर असा आहे रणबीरचा पुढचा प्लान, जाणून घ्या काय करणार...
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे. सोशल मीडियापासून ते संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये या कपल्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. या लग्नाशी संबंधित दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. वृत्तानुसार, लग्नाचे सेलिब्रेशन 13 ते 17 एप्रिल दरम्यान होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार लग्नानंतर रणबीर कपूर ब्रेक घेणार आहे.
शूटिंगमध्ये बिझी असणार आलिया-रणबीर
संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित निर्माते मुराद खेतानी यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी रणबीर कपूर मनालीला जाण्यापूर्वी फक्त एक आठवड्याचा ब्रेक घेणार आहे. रणबीर कपूर 22 एप्रिल रोजी अॅनिमल्सच्या शूटिंगसाठी मनालीला जाणार आहे. या ठिकाणी चित्रपटाचे दोन दिवसांचे शेड्यूल असेल आणि नंतर ते मुंबईत पूर्ण होईल. लग्नानंतर आलिया रणवीर सिंगसोबत तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगसाठी स्वित्झर्लंडला जाण्याची शक्यता आहे. जवळपास एक आठवडा शूटिंग चालणार असून लग्नानंतर आलियाचे हे पहिलेच आऊटडोअर शूट असेल. या शूटिंगमध्ये आलियासोबत रणबीर कपूर असणार आहे.
चाहते रणबीर-आलियाच्या लग्नाची वाट पाहत आहेत
रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र आहे. सध्या लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. मात्र, अद्याप या लग्नाबाबत रणबीर आणि आलियाचे कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. १५ एप्रिल रोजी पहाटे २ ते ४ या वेळेत त्यांच्या सात फेऱ्या होतील. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसोबतच चाहतेही रणबीर आणि आलियाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर आणि आलियाकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत आणि दोघेही लग्नानंतर लगेच कामाला सुरुवात करणार आहेत.