घराचे व्हिडीओ परवानगी न घेता शेअर केल्याने आलिया भटची नाराजी, म्हणाली- "सुरक्षेच्या दृष्टीने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:30 IST2025-08-26T18:29:05+5:302025-08-26T18:30:53+5:30
आलिया - रणबीरच्या घराचे व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांनी व्हायरल केल्याने अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केलीय. काय म्हणाली

घराचे व्हिडीओ परवानगी न घेता शेअर केल्याने आलिया भटची नाराजी, म्हणाली- "सुरक्षेच्या दृष्टीने..."
गेल्या काही दिवसांपासून आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण परवानगीशिवाय फोटो पोस्ट केल्याने आलिया भटने नाराजी व्यक्त केली. आलिया भट म्हणाली, ''माझे म्हणणं तुम्हाला समजले असेल की, मुंबईसारख्या शहरात जागा मर्यादित आहे. कधीकधी तुमच्या खिडकीतून तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे घर असते. पण याचा अर्थ असा नाही की, कोणालाही तुमच्या खाजगी घराचा व्हिडिओ बनवण्याचा आणि ते ऑनलाइन प्रसिद्ध करण्याचा अधिकार आहे. आमच्या घराचा, जे अजूनही बांधकाम सुरू आहे, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो आमच्या परवानगीशिवाय अनेक माध्यमांनी प्रसारित केला आहे.'
''आमच्या प्रायव्हसीचा भंग करणारी ही कृती आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या आहे. परवानगीशिवाय कोणाच्याही खाजगी जागेचे व्हिडिओ किंवा फोटो काढणे हा content नाही, तर तो एक गुन्हा आहे. ही कृती सामान्य मानली जाऊ शकत नाही. कृपया विचार करा, तुमच्या घराच्या आतील भागाचे व्हिडिओ तुमच्या परवानगीशिवाय सार्वजनिकपणे शेअर केलेले तुम्हाला आवडतील का? आपल्यापैकी कोणालाही ते आवडणार नाही.''
''म्हणून ही एक नम्र पण ठाम विनंती आहे - जर तुम्हाला असे व्हिडिओ ऑनलाइन दिसले, तर कृपया ते पुढे पाठवू नका किंवा शेअर करू नका. आणि आमच्या मीडियामधील मित्रांना ज्यांनी हे व्हिडिओ आणि फोटो प्रसारित केले आहेत, मी तुम्हाला विनंती करतो की, ते तातडीने काढून टाका.'' अशाप्रकारे आलियाने सर्वांना ही विनंती केली. अनेकांनी आलियाच्या या म्हणण्याचं समर्थन केलं असून तिच्या मताचा आदर केलाय. आलिया सध्या रणबीर कपूर, विकी कौशलसोबत 'लव्ह अँड वॉर' या सिनेमाचं शूटिंग करत आहे.