'गंगुबाई'ने मारली थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री; Heart of Stone मध्ये झळकणार आलिया भट्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:18 IST2022-03-08T14:17:53+5:302022-03-08T14:18:23+5:30
Alia bhatt: चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन आलियाच्या अपकमिंग चित्रपटाची घोषणा केली आहे.

'गंगुबाई'ने मारली थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री; Heart of Stone मध्ये झळकणार आलिया भट्ट
अभिनेत्री आलिया भट्ट हिची मुख्य भूमिका असलेला गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात आलियाने गंगुबाई ही भूमिका साकारली असून सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. विशेष म्हणजे आलियासाठी हे नवीन वर्ष करिअरच्या दृष्टीने खास ठरत आहे. कारण, गंगुबाईनंतर आता आलिया चक्क हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन आलियाच्या अपकमिंग चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टनुसार, आलिया Heart of Stone या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Heart of Stone हा स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आलियासोबत गॅल गॅडोट (Gal Gadot) आणि Jamie Dornan हे स्क्रीन शेअर करणार आहेत. तसंच टॉम हार्पर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
दरम्यान, सध्या तरी या चित्रपटाविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा आलियाचा हॉलिवूडमधील डेब्यू मुव्ही आहे. तसंच या चित्रपटात आलिया नेमकी कोणती भूमिका साकारणार हेदेखील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.