'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:02 IST2025-09-05T10:02:02+5:302025-09-05T10:02:52+5:30

'लव्ह अँड वॉर'चं शूट आणि राहाला वेळ देण्यावर आलिया भट म्हणाली...

alia bhatt talks about working with husband ranbir kapoor in love and war how they managed to give time to daughter raha | 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...

'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt)आगामी 'लव्ह अँड वॉर' सिनेमात दिसणार आहेत. विकी कौशलही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. हे तिघंही या सिनेमात एकत्र येत असल्याने चाहते खूप उत्सुक आहेत. रणबीर आणि आलिया चिमिकल्या राहाचे पालक आहेत. एकाच सिनेमात काम करत असल्याने लेकीला वेळ देणं कठीण होतं का? असा प्रश्न आलियाला विचारण्यात आला होता. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. 

दोघंही एकाच सिनेमात काम करत असल्याने शूटिंगच्या वेळा सांभाळून राहाला कसा वेळ देता? Grazia ला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट म्हणाली, "ऐकायला बाळबोध वाटेल पण याचा काहीच तोटा जाणवला नाही उलट फायदाच झाला. आम्ही सिनेमाचं बरंचसं शूटिंग रात्रीच केलं. त्यामुळे दिवसा आम्ही राहाबरोबरच असायचो. काही दिवस रणबीरचं शूट असायचं काही दिवस माझं. आम्ही नेहमीच एकत्र सेटवर नव्हतो."

ती पुढे म्हणाली, "राहा काही वेळेला आमच्यासोबत सेटवरही आली आहे आणि तिने मस्त एन्जॉय केलं आहे. तसंच राहा स्वत: आता तिचे क्लासेस, प्लेडेटमध्ये व्यग्र असते. आजीआजोबांसोबत वेळ घालवत असते. आमच्या अनुपस्थितीत राहाचा सांभाळ करणारे इतके लोक आहेत त्याबद्दल खरंच मी खूप ऋणी आहे."

'लव्ह अँड वॉर' शिवाय आलिया 'अल्फा' या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती कधीही न दिसलेल्या अशा दमदार अॅक्शन भूमिकेत आहे. 

Web Title: alia bhatt talks about working with husband ranbir kapoor in love and war how they managed to give time to daughter raha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.