रणबीर-आलियाचं दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली "माझ्या मुलाचं नाव..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:03 IST2025-03-06T18:02:41+5:302025-03-06T18:03:47+5:30
'राहा'नंतर आता रणबीर आणि आलियानं दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग सुरू केल्याचं बोललं जात आहे.

रणबीर-आलियाचं दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली "माझ्या मुलाचं नाव..."
बॉलिवूडची लोकप्रिय स्टार जोडी अर्थात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) प्रचंड चर्चेत असते. दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे अनेकदा दिसून आलं आहे. आलिया आणि रणबीर कायमच एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहिलेले दिसलेत. दोघेही चाहत्यांना कपल्स गोल देताना दिसतात. आलिया, रणबीरसोबतच त्याची लाडकी लेक 'राहा' (Raha Kapoor ) देखील कायम चर्चेत असते. राहा अतिशय क्यूट आहे. 'राहा'नंतर आता रणबीर आणि आलियाचं दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. याला कारणही तसेच आहे.
नुकतंच आलियानं जय शेट्टीला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलासा केले. यावेळी तिनं आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव ठरवल्याचं सांगितलं. यावरुनच या कपलची दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग सुरू झाल्याची चर्चा रंगलीय. मुलाखतीमध्ये आलिया म्हणाली, "मी आणि रणबीर आमच्या फॅमिली ग्रृपवर बाळासाठी नाव सुचवण्यास सांगितलं होतं. तेव्हा प्रत्येकानं आपल्याला आवडणारी नाव दिली. यावेळी आम्हाला त्यातील एक मुलाचं नाव खूप आवडलं. जेव्हा आम्हाला दुसरे मूल होईल, तेव्हा आम्ही ते नाव ठेवू. पण मी आत्ताच तुम्हाला ते नाव सांगणार नाही". तसेच नितू कपूर यांनी 'राहा' हे नाव सुचवल्याचंही आलियानं सांगितलं. तर 'राहा' आणि मुलासाठी ठरवलेलं नाव एकमेंकाशी मिळते-जुळते आहेत.
आलिया आणि रणबीर एप्रिल २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. तर नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी मुलगी 'राहा'ला जन्म दिला. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आलिया शेवटची वेदांग रैनासोबत 'जिगरा' या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती डे संजय लीला भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.