आणखी एक रिमेक! पुन्हा एकदा वरूण धवन-आलिया भट्टची सुपरहिट जोडी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:08 IST2019-01-04T13:03:48+5:302019-01-04T13:08:41+5:30
वरूण धवन व आलिया भट्ट या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरूण व आलियाची जोडी जवळजवळ फायनल झाली आहे.

आणखी एक रिमेक! पुन्हा एकदा वरूण धवन-आलिया भट्टची सुपरहिट जोडी!!
वरूण धवन व आलिया भट्ट या आॅनस्क्रीन जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरूण व आलियाची जोडी जवळजवळ फायनल झाली आहे. अर्थात अद्याप याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
आता हा सुपरहिट चित्रपट कुठला, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर हा चित्रपट आहे, ‘कुली नंबर 1’. होय, १९९५ साली रिलीज झालेल्या ‘कुली नंबर 1’ने धूम केली होती. या चित्रपटाची गाणी तर लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. चित्रपटातील गोविंदा व करिश्मा कपूरच्या जोडीनेही धम्माल केली होती. याच ‘कुली नंबर 1’चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
या चित्रपटातून वरूण व आलियाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. आधी यात सारा अली खान दिसणार, अशी चर्चा होती. पण आता साराच्या जागी आलियाची वर्णी लागल्याची चर्चा आहे. ही चर्चा खरी ठरली तर ‘कुली नंबर 1’चा रिमेकही सुपरहिट ठरणार, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. हा रिमेक वरूणचा भाऊ रोहित धवन प्रोड्यूस करणार आहे. तर वरूणचे पापा डेव्हिड धवन याचे दिग्दर्शक असतील.
तसा वरूण व आलियाचा आणखी एक चित्रपट लवकरच रिलीज होतोय. या चित्रपटाचे नाव आहे,‘कलंक’. धर्मा प्रॉडक्शनच्या या मल्टिस्टारर चित्रपटात आलिया व वरूण हे दोघेही लीड रोलमध्ये आहेत. आलिया व वरूण या जोडीने ‘स्टुडंट आॅफ द ईअर’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
तूर्तास वरूणकडे अनेक नवे प्रोजेक्ट आहेत. ‘कलंक’ हातावेगळा केल्यानंतर तो शशांक खेतानच्या एका थ्रीलर चित्रपटात दिसणार आहे. यापाठोपाठ रेमो डिसुजाच्या ‘एबीसीडी3’मध्येही त्याची वर्णी लागली आहे.