"बेबी झाला..."; स्वतःच्या वाढदिवशी आलिया भटने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:15 IST2026-03-16T11:13:17+5:302026-03-16T11:15:49+5:30
१५ मार्चला आलिया भटच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन झालं. तिने हा दिवस आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत खास बनवला आहे. स्वतःच्याच वाढदिवशी आलियाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

"बेबी झाला..."; स्वतःच्या वाढदिवशी आलिया भटने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भटचा ३३ वा वाढदिवस नुकताच झाला. १५ मार्चला आलिया भटच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन झालं. तिने हा दिवस आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत खास बनवला आहे. स्वतःच्याच वाढदिवशी आलियाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी निर्माती असलेल्या आलियाने आता व्यावसायिक क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'इटरनल किड्स' या नव्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली.
काय आहे 'इटरनल किड्स'?
आलियाने आपल्या सोशल मीडियावरून या नव्या उपक्रमाची माहिती दिली. 'इटरनल किड्स' हे तिच्या 'इटरनल सनशाइन प्रोडक्शन्स'चा एक नवीन भाग असून, याचा मुख्य उद्देश लहान मुलांसाठी कल्पक आणि मनाला भिडणाऱ्या कथा, चित्रपट आणि शोज तयार करणे हा आहे. आलियाने पोस्टमध्ये मजेशीरपणे लिहिले की, "आमच्या प्रोडक्शन कंपनीला एक 'बेबी' झाला आहे; भेटा आमच्या 'इटरनल किड्स'ला." आलियाने ही खास बातमी शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
या नव्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत 'देअर्स सी अँड जी अँड एम' नावाची पहिली कथा समोर येणार आहे. ही कथा आलियाच्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींवर आधारित आहे. आलिया आणि तिची बहीण शाहीन भट याच गोष्टी ऐकून मोठ्या झाल्या आहेत. बालपणाचा हा अनमोल ठेवा आता सर्व मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलिया खूप उत्सुक आहे. 'इटरनल किड्स'च्या माध्यमातून अनेक नवनवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरू झाल्याचेही तिने यावेळी सांगितले. आलिया सध्या तिच्या 'अल्फा' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.