स्वयंपाक करताना आलिया भटच्या हाताला भाजलं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:33 IST2025-04-08T16:32:42+5:302025-04-08T16:33:53+5:30

आलिया भटनं तिच्या युट्यूब चॅनलवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय.

Alia Bhatt burns her hand while making apple crumble mother Soni Razdan's reaction cute | स्वयंपाक करताना आलिया भटच्या हाताला भाजलं, पाहा व्हिडीओ

स्वयंपाक करताना आलिया भटच्या हाताला भाजलं, पाहा व्हिडीओ

भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आलिया भट आहे. आलिया ही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतंच आलियानं तिच्या आईसोबत मिळून स्वादिष्ट असं 'अ‍ॅपल क्रम्बल' बनवलं. पण, यावेळी आलिया भटच्या हाताला चटका बसलाय.

आलिया सध्या चित्रपटांसोबतच तिच्या यूट्यूब चॅनलवरही बरीच सक्रिय आहे. अलीकडेच, तिने तिच्या युट्यूब चॅनलवर 'इन माय मामाज किचन' ( In My Mama's Kitchen) असं कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आणि तिची आई सोनी राजदान या 'अ‍ॅपल क्रम्बल' बनवताना दिसत आहेत. यावेळी व्हिडीओच्या शेवटी आलिया चुकून 'अ‍ॅपल क्रम्बल' ठेवलेल्या गरम ट्रेला स्पर्श करते. ज्यामुळे तिचा हात भाजल्याचं दिसतं. आलियाच्या हाताला भाजताच तिची आई काळजीत पडते आणि लगेचच अभिनेत्रीचा हात थंड पाण्यात टाकण्यास सांगते. आई सोनी राजदानचं आलियावर असलेलं प्रेम पाहून चाहतेही कौतुक करताना दिसले. 

आलियाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. जो २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये रणबीर कपूरदेखली आहे.  याशिवाय आलिया 'अल्फा'मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये आलियासोबत मराठमोळी शर्वरी वाघ झळकणार आहे.

Web Title: Alia Bhatt burns her hand while making apple crumble mother Soni Razdan's reaction cute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.