पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:38 IST2025-12-11T13:36:19+5:302025-12-11T13:38:59+5:30
आलिया भटच्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे

पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
दुबईमध्ये नुकताच रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐश्वर्या राय बच्चन, क्रिती सेननसह अनेक सेलिब्रिटींनी या फेस्टिवलमध्ये हजेरी लावली. आलिया भटही फेस्टिवलमध्ये सहभागी झाली. ब्लॅक गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. यावेळी आलिया भटने मुलाखतही दिली. एका पाकिस्तानी चाहत्याने तिला पाकिस्तानला कधी येणार? असा प्रश्न विचारला. त्यावर आलियाने दिलेलं उत्तर व्हायरल होत आहे.
आलिया भटने रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक विषयांवर चर्चा केली. करिअरची सुरुवात, सिनेमातील यश-अपयश, फिटनेस आणि लेक राहाबद्दलही तिने अनेक खुलासे केले. यावेळी एका चाहत्याने तिला विचारलं, 'ग्लोबल स्टेजवर भारताचं प्रतिनिधित्व करताना दडपण येतं का?' यावर ती म्हणाली, "भारतीय म्हणून उलट माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे." यानंतर पाकिस्तानी चाहत्याने तिला पुढे विचारले, 'पाकिस्तानमध्ये कधी येणार?' तेव्हा आलिया म्हणाली,"कामासाठी मला जिथेही जावं लागेल तिथे मी आनंदाने जाईन."
नेपोटिझमवर आलिया म्हणाली, "तुम्ही कोणत्याही कुटुंबातले असो शेवटी तुमच्यात किती टॅलेंट आहे तेच महत्वाचं आहे. जेव्हा प्रेक्षक तुम्हाला योगदान देताना पाहतात तेव्हा सगळं माफ असतं."
लेक राहाबद्दल आणि वर्क-लाईफ बॅलन्सवर आलिया म्हणाली, "राहाने आता पापाराझींसोबतही वेगळं कनेक्शन बनवलं आहे. ती आता इतकी मोठी झाली आहे की मी कुठेही जात असताना ती मला विचारते की मी कुठे जातीये? परत कधी येणार? आई झाल्यानंतर काम आणि वैयक्तिक आयुष्यत समतोल राखणं हे अगदी परफेक्ट जमेल असं नाही. हे खूप सुंदररित्या अव्यवस्थित आहे. उदाहरणार्थ अशा फेस्टिवलला हजेरी लावल्यानंतर मी पुन्हा घरी जाऊन पजामामध्ये असते आणि पिझ्झा खात आराम करते."